Bhendval Prediction Agrowon
ॲग्रो विशेष

Bhendwal Ghatmandni : दिल्लीच्या तख्तापासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भेंडवळच भाकीत आलं समोर

Bhendval Prediction : ३०० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळचे भाकीत समोर आले आहे. या भाकणूकीत दिल्लीच्या तख्तापासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भाकीत करण्यात आले आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बुलढाण्यात दरवर्षी पावसाळा सुरु होण्याआधी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी केली जाते. यावेळी राजकीय गोष्टींपासून शेतकऱ्यांच्या पीक पाण्यापर्यंत भाकणूक केली जाते. याकडे अख्या देशाचे लक्ष लागलेले असते.  यंदाच्या वर्षी भेंडवळच्या घट मांडणीतून पीक पाण्यासह दिल्लीच्या तख्तावर भाकीत करण्यात आले आहे. यात देशाचे पंतप्रधान मोदीच कायम राहतील. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत असेल यासह शत्रू राष्ट्रांच्या कारवायांना यंदा ब्रेक लागे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नुकताच राज्यातील ११ जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून सत्ताधाऱ्यांची कमी मतदान झाल्याने झोप उडालेली आहे. यामुळे सध्या देशात मोदी बसणार की विरोधी इंडिया आघाडी बाजी मारणार अशी चर्चा रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीत जनता कोणाच्या पारड्यात मताचा कौल टाकणार?, वरूणराजा बळीराज्याला तारणार काय? या प्रश्नांकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान ३०० वर्षांची पंरपरा लागलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळमध्ये पाऊस पाण्यावर भाकीत करण्यात आले आहे. जे शेतकऱ्यास धीर देणारे आहे. 

शनिवारी (ता. ११) सकाळीच चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सहकारी सारंगधर महाराज यांनी ही भेंडवळची भाकणूक केली. ही भाकणूक त्यांनी आधल्या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गोल खड्डा ठेवलेल्या १८ प्रकारच्या धान्याच्या निरीक्षणावरून केली. यावेळी केलेल्या भाकणूकीत, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस होणार असून पिकं जोमात येतील. रान हिरवगार होऊन यंदा आबादाणी भरपूर होईल. रोगराईचा प्रादूर्भाव कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे सांगण्यात आले आहे. 

तसेच लोकसभा निवडणुकीची धामधूमीत देशात कोणत्या पक्षाचे सरकार येणार? कोण पंतप्रधान होणार? जनता कुणाच्या पारड्यात कौल टाकणार? याबाबत ही भेंडवळच्या भाकणूकीत भाकित करण्यात आले. यात पंतप्रधान मोदींच्या भाजपला जनता कौल देईल असे शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर देशाची संरक्षण व्यवस्था मजबूत होऊन शत्रू राष्ट्रांच्या कारवाया यावर्षी होणार नाहीत असेही भाकित करण्यात आले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

Maharashtra Farmer Crisis: अतिवृष्टी, महापुरात शेतकरी उघड्यावर

Agriculture Livestock Scheme: गाई-म्हशीसाठी ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारची योजना

Water Management: धरण व्यवस्थापन संहिता

Rain Crop Damage: सांगली जिल्ह्यातील सात हजार एकरांवरील पिके पाण्यात

SCROLL FOR NEXT