Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : प्रलंबित पीकविमा, अतिवृष्टीची मदत तातडीने द्या

Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानासाठी पीकविमा मिळालेला नाही. तसेच २०२४ मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची आहे.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानासाठी पीकविमा मिळालेला नाही. तसेच २०२४ मधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची आहे. हा निधी शासनाने तातडीने द्यावा, अशी मागणी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी केली.

सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांचा प्रलंबित पीकविमा, अतिवृष्टीची मदत मिळावी, यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून त्वरित शेतकऱ्यांना मोबदला दिला जावा, अशी मागणी केली. जिल्ह्यासह राज्यात शेतकऱ्यांचा पीकविमा अद्याप प्रलंबित आहे. मंजूर असलेला हा पीकविमा देण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले.

चर्चेत आमदार कुटे म्हणाले, की राज्यातील सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करीत आहे. ज्याप्रमाणे धान उत्पादकांचा प्रश्‍न मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. तसाच पीकविम्याचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचा पीकविमा अद्याप प्रलंबित आहे.

कारण संबंधित कंपनीने जिल्ह्यात शेतकऱ्यांना ११० टक्के वाटप केले आहे. त्यामुळे पुढील निधी शासनाकडून मिळणे अभिप्रेत आहे. या निधीसाठी कंपनी वाट पाहत आहे. याशिवाय २०२४ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याचीही भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

परिणामी पीकविमा, अतिवृष्टीची मदत असो शासनाने तातडीने ही मदत राज्यातील शेतकऱ्यांना केली पाहिजे. यावर कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, की राज्य शासनाचा लवकरच हिस्सा भरला जाणार आहे. पुढे केंद्राचीही मदत येईल. आमदार कुटे यांची मागणी पाहता त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून मार्ग काढू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका

Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

Fort Conservation: गड संवर्धनासाठी एकवटले मावळे

Mahabeej Seed Sales Stalled: पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प

SCROLL FOR NEXT