Brick Labor  Agrowon
ॲग्रो विशेष

Brick Labor : वाढत्या बांधकामासोबत वीटभट्टी कामगारांचे दु:खही वाढले

Labor Issue : पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बांधकाम क्षेत्रात वाढ झाल्याने विटांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे

Team Agrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या वीट व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बांधकाम क्षेत्रात वाढ झाल्याने विटांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे, मात्र या व्यवसायासोबतच वीटभट्टी कामगारांच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत.

अवकाळी पाऊस न झाल्यास हा व्यवसाय नफ्याचा ठरतो, पण प्रतिकूल हवामान, मजुरीतील वाढ आणि साहित्याच्या दरातील वाढ यामुळे अनेक वीटभट्टी व्यावसायिक चिंतेत आहेत.

सध्या वीटभट्टी कामगार ठेकेदार पद्धतीने काम करत आहेत. हजार विटा तयार करण्यासाठी त्यांना केवळ ३०० ते ५०० रुपये मिळतात. ही मजुरी त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अपुरी ठरत आहे. दिवस-रात्र मेहनत करूनही त्यांना कोणत्याही सामाजिक सुरक्षा, सुविधा मिळत नाहीत.

उन्हाळ्यात तापमान ४० अंशांपेक्षा जास्त असतानाही ते काम करत आहेत. वीटभट्ट्या बहुतांश वेळा डोंगराळ, नदीनिकट अथवा एकांत ठिकाणी असतात, जिथे मूलभूत सुविधा नाहीत. पिण्याच्या पाण्याचा अभाव, अस्वच्छ राहणीमान आणि सततच्या धुरामुळे कामगारांना फुप्फुसाचे आजार, दम्याचा त्रास, त्वचाविकार यांचा सामना करावा लागतो.

यातील अनेक कामगार व्यसनाधीन झाले असून, त्यांच्या आरोग्यावर याचा मोठा परिणाम होत आहे. प्रशासनाकडून अधूनमधून वैद्यकीय तपासणी केली जाते, मात्र ती अपुरी ठरते. सध्या मातीच्या विटांना मोठी मागणी आहे, पण त्यासाठी लागणारे साहित्य माती, कोळसा, ग्रीड, रेती यांचे दर वाढले आहेत.

त्यामुळे उत्पादन खर्च वाढला असून, व्यापाऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यंदा व्यवसाय उशिरा सुरू झाला असून, सध्या तयार झालेल्या विटांचा दर पाच हजार विटांसाठी ३० हजार रुपये आहे.

वीट कामगार, तसेच इतर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यथा आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो. या कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आम्ही शासन दरबारी प्रश्न मांडून त्याला वाचा फोडतो.
- सतेंद्र मातेरा, सचिव, एकलव्य आदिवासी क्रांती दल, पालघर जिल्हा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino Warning: ‘एल निनो’चा इशारा गांभीर्याने घ्यावा : डॉ. सहाय

Seed Distribution: तीन लाख क्विंटल बियाणे उपलब्ध: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Banana Export Price: निर्यातीच्या केळीला २३०० रुपये दर

Farm Loan Waiver: एप्रिल २०१९ पासूनची सर्व पुनर्गठीत कर्जे माफीस अपात्र

Maharashtra Monsoon Update: मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला

SCROLL FOR NEXT