Vitbhatti Business : श्रीवर्धनमध्ये दोन वर्षांत ४२ वीटभट्ट्या बंद

Brick Business : सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात आला आहे.
Vitbbhatti Business
Vitbbhatti BusinessAgrowon
Published on
Updated on

Shrivardhan News : सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्यातील वीटभट्टी व्यवसाय संकटात आला आहे. तालुक्यात दोन वर्षांत ६० वीटभट्ट्यांपैकी ४२ वीटभट्ट्या बंद झाल्या आहेत तर उर्वरित १८ वीटभट्ट्या भुसा, लाकडांचा तुटवडा व मजुरांची कमतरता आदी कारणास्तव बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

डोंगरावरील लाल माती किंवा शेत जमिनीमधील काळ्या मातीचा वापर वीट बनवण्याकरिता करण्यात येतो. भट्टीच्या फडात (मोकळ्या जागेवर) मातीचा ढिगारा करून मजुरांकडून पायाने मळण्यात येते. एकजीव झालेली ओली माती सुकू लागल्यावर मजूर हाताने आयताकार लाकडी साच्यात टाकून विटेचा आकार देतात.

Vitbbhatti Business
Vitbhatti Business : वीटभट्टी व्यवसायावर पावसाची अवकृपा

ओली वीट साच्यातून काढीत पाच ते सहा दिवस नैसर्गिकरीत्या सुकवली जाते. त्‍यानंतर काही प्रमाणात सुकलेल्या विटांचा भट्टीत थर रचून पोकळीत लाकूड आणि भुशाच्या (कोंडा) सहाय्याने भट्टी पेटवण्यात येते. पक्की वीट तयार होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागतो.

बांधकाम व्यावसायिकांच्‍या मागणीनुसार, वेगवेगळी लांबी, रुंदी, उंचीप्रमाणे व्यावसायिक विटा तयार करतात. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून व्यावसायिक वीटभट्ट्या लावण्यास सुरुवात करतात. ऑक्‍टोबरपर्यंत परतीच्या पावसाने मुक्‍काम केल्‍याने विटा खराब झाल्‍या. मजुरांची कमतरता : एका वीटभट्टीवर १२ जोडीची (२४ मजूर) गरज असते. श्रीवर्धन तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने तालुक्याबाहेरचे मजूर आणावे लागतात.

Vitbbhatti Business
Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

एका जोडीची दिवसाची मजुरी पंधराशे रुपये असून सहा महिन्यांचा करार केला जातो. यासाठी बयाणा (आगाऊ रक्कम) द्यावा लागतो. कोंड्याचा (भुसा) तुटवडा : श्रीवर्धन तालुक्यात २०१६-२०१७ मध्ये भातपिकाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होत असल्याने येथील आठ भात गिरण्यांमधून कोंडा मुबलक प्रमाणात मिळायचा.

दिवसागणिक भातशेतीचे प्रमाण कमी झाल्‍याने गिरण्या बंद झाल्‍या आहेत. सध्या तालुक्यात आठपैकी दोनच भात गिरण्या सुरू आहेत. कोंडा उपलब्ध होत नसल्‍याने आणि इतर तालुक्यातील कोंडा आणणे खिशाला परवडत नसल्‍याने वीटभट्टी व्यावसायिक संकटात आले आहेत.

सरकारकडून अपेक्षा : नैसर्गिक आपत्तीत शेतकरी, बागायतदारांचे पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून आर्थिक मदत मिळते. वीटभट्टी व्यवसाय साधारण जूनपर्यंत सुरू असतो, मात्र यंदा अवकाळी पाऊस त्‍यानंतर लांबलेल्‍या परतीच्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कच्चा माल खराब झाल्‍याने अनेक ठिकाणी अद्याप वीटभट्ट्या लावलेल्‍या नाहीत. सरकारकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com