Banana Export Price: निर्यातीच्या केळीला २३०० रुपये दर
Banana Market Update: खानदेशातून आखाती देशांमध्ये केळी निर्यातीला एप्रिल महिन्यापासून काहीशी गती आली आहे. सद्यःस्थितीत १० ते १२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सुरू आहे. निर्यातीच्या केळीला कमाल २३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे.