Bricks Production : पावसाळा लांबला, विक्रमगडच्या वीट उत्पादनात घट

Bricks Business : यंदा पावसाळा लांबल्याने वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. तसेच सध्या ढगाळ वातावरण असल्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
Brick Industry
Brick IndustryAgrowon
Published on
Updated on

Palghar News : तालुक्यामध्ये वीटभट्टी व्यवसायाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून विटांचे भाव पडल्याने या व्यवसायाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यंदा पावसाळा लांबल्याने वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नाही. तसेच सध्या ढगाळ वातावरण असल्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. तालुक्यात घरकुलांची कामे जोमात चालू असल्याने विटांची मागणी जास्त प्रमाणात होत आहे, मात्र माल उपलब्ध नसल्याने विटांची टंचाई भासत आहे.

Brick Industry
Agricultural Issues : प्रतिक्रियांमधून उलगडले शेती समस्यांचे वास्तव

वीट तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे विटांच्या किमती कडाडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विटा तयार करण्याच्या साहित्य दुपटीने महागल्याने विटांच्या किमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याचे सागण्यात येते.

Brick Industry
Vitbhatti Business : श्रीवर्धनमध्ये दोन वर्षांत ४२ वीटभट्ट्या बंद

विटांसाठी मुखत्वे तूस, दगडी कोळसा, माती, भट्टीसाठी जागा, त्याकरिता लागणारा मजूर वर्ग, तात्पुरती बिनशेती करण्याचा परवानगी, रॉयल्टी, जमिनीचा धारा आदींसाठी दरवर्षी दर वाढत आहे. त्याचा परिणाम वीट उत्पादनावर होत असून विटांच्या किमतीही वाढत जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे व्यावसायिकांना जादा भावाने वीट विकावी लागणार आहे अन्यथा तोटाच सहन करावा लागेल, असे वीटभट्टी मालकांनी सांगितले. विक्रमगडमध्ये दिवसेंदिवस या व्यवसायामध्ये तरुणवर्गाचे वाढते प्रमाण आहे. माती आणि मुबलक पाणी यामुळे येथे हा व्यवसाय वाढला आहे. परंतु या वर्षी विटेसाठी आवश्यक माती, दगडी कोळसा, गंधक यांच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा फटकाही व्यवसायाला बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com