Employees Suspended  Agrowon
ॲग्रो विशेष

Embezzlement Case : अपहारप्रकरणी सिद्धेवाडीचा शाखाधिकारी, लिपिक निलंबित

Sangli District Bank Employee Suspension : जिल्हा बॅँकेच्या सिद्धेवाडी शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ७.७३ लाखांच्या रकमेवर बॅँकेच्या कर्मचाऱ्‍यानेच डल्ला मारला. याप्रकरणी हलगर्जी केल्याबद्दल शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांना, तर अपहार केलेला कर्मचारी एस. व्ही. कोळी याला निलंबित केले आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा बॅँकेच्या सिद्धेवाडी शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीतील ७.७३ लाखांच्या रकमेवर बॅँकेच्या कर्मचाऱ्‍यानेच डल्ला मारला. याप्रकरणी हलगर्जी केल्याबद्दल शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांना, तर अपहार केलेला कर्मचारी एस. व्ही. कोळी याला निलंबित केले आहे. दरम्यान, बँकेच्या प्रशासनाकडून जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपविल्याबद्दल तिघांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

जिल्हा बँकेतील शेतकऱ्‍यांच्या खात्यावर शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान, विमा रक्कम देण्यात येते. या रकमेचा अपहार करून ती काढल्याचा प्रकार तासगाव मार्केट यार्ड शाखेत पुढे आला. त्याशिवाय त्यानंतर सिद्धेवाडी येथेही असा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले. दुष्काळ निधी अपहारप्रकरणी दोषींवर मागील आठवड्यात कारवाई केली होती.

सिद्धेवाडी येथील शाखेची चौकशी अधिकाऱ्‍यांमार्फत केली आहे. त्यामध्ये शाखेतील लिपिक एस. व्ही. कोळी याने दुष्काळी निधीतील ७ लाख ७३ हजार रुपयांच्या रकमेवर डल्ला मारल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शाखाधिकारी व्ही. एस. सूर्यवंशी यांनी लिपिक कोळी याच्या कामावर विश्वास ठेवून कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्‍यांच्या पथकाने ठेवला आहे. यामुळे शाखाधिकारी सूर्यवंशी आणि लिपिक कोळी याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

तासगावमधील मार्केट यार्ड शाखेतील अपहाराची माहिती लपविल्याबद्दल जे. एस. डोंगरे, एस. ए. कुंभार आणि यू. एन. कांबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

आतापर्यंत ७ जण निलंबित

जिल्हा बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखा आणि सिद्धेवाडी शाखेत मिळून सुमारे २ कोटी ४३ लाख रुपयांचा दुष्काळ निधीचा अपहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. या अपहारप्रकरणी तासगाव मार्केट यार्ड आणि सिद्धेवाडी शाखेतील आतापर्यंत ७ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते

Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

SCROLL FOR NEXT