Tasgaon Bank Embezzlement : तासगाव शाखा अपहारप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित

Employees Suspended : अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले, कर्मचारी योगेश वजरीनकर, प्रमोद कुंभार यांना निलंबित करण्यात आले.
Employees Suspended
Employees Suspended Agrowon
Published on
Updated on

Sangli News : अपहार केल्याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले, कर्मचारी योगेश वजरीनकर, प्रमोद कुंभार यांना निलंबित करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या ठाणेदारांच्या बदल्या करण्याचा तसेच जिल्ह्यातील शाखांची ६ पथकामार्फत येत्या आठवड्यात तपासणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २०) संचालक मंडळाची बैठक झाली. उपाध्यक्षा जयश्री पाटील, मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब होनमोरे, राहुल महाडिक, मन्सूर खतीब, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

Employees Suspended
Officer Suspended : सिंचन विहीर मंजुरीसाठी पैसे मागणारा अधिकारी सेवामुक्त

वजरीनकरचे एकेकाळचे सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपिक प्रमोद कुंभार यांनी निमणी शाखेतील अवकाळी मदत निधीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. तासगाव मार्केट यार्ड शाखेचे शाखाधिकारी एम. व्ही. हिले यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी तिघांना निलंबित करण्यात आले आहे.

संचालक मंडळाच्या निर्णयाची माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले, ‘संबंधित कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू आहे. तासगाव तालुक्यातील मार्केड यार्ड शाखेत ५६.३३ लाख रुपयांचा अपहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन कर्मचारी आणि शाखाधिकारी यांना निलंबित केले. त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. संचालक मंडळाच्या बैठकीत हा एकमताने निर्णय घेतला.

Employees Suspended
Talathi Suspended : इंदवेचे तलाठी निलंबित; रंजानेच्या मंडळाधिकाऱ्यांना नोटीस

शाखा तपासणीसाठी सहा पथके स्थापन

तासगाव येथील अपहार प्रकरणानंतर बॅंकेच्या जिल्ह्यातील सर्वच शाखांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाभरात ६ पथके स्थापन केली आहेत. पथकांमध्ये ६ ते ८ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. तालुकानिहाय चार ते पाच दिवसांत तपासणी केली जाईल. येत्या पाच-सहा दिवसांत तपासणी पूर्ण होईल.

जिल्हा बॅंकेत विविध शासकीय योजनांचा निधी जमा होतो. त्यावर यापूर्वी संबंधित शाखा प्रमुखांचे नियंत्रण होते. यापुढे सर्व शासकीय निधीवर मुख्यालयाचेच नियंत्रण राहील. खातेच लॉक असेल. परवानगीशिवाय त्या खात्यावर व्यवहारच होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाखांच्या तपासणीचा निर्णय घेतला आहे.
मानसिंगराव नाईक, आमदार, अध्यक्ष, सांगली जिल्हा सहकारी बॅंक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com