Cotton, Soybean Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Subsidy : सोयाबीन, कापूस अनुदानाच्या संगणकीकरण कामावर बहिष्कार

Agriculture Subsidy : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याच्या योजनेची ग्रामस्तरावर कृषी सहायकांना माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

Team Agrowon

Nanded News : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याच्या योजनेची ग्रामस्तरावर कृषी सहायकांना माहिती गोळा करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत.

त्यामुळे तलाठी व ग्रामसेवकांप्रमाणे कृषी सहायकांनी लॅपटॉप देण्यात यावे, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने या योजनेच्या संगणकीकरण करण्याच्या कामावर बहिष्कार टाकला आहे.

राज्य शासनाने खरीप हंगाम २०२३ मधील ई-पीक पाहणी केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान वितरणाच्या निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने कृषी सहायकांना क्षेत्रीय स्तरावर काम करताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. योजनेतील कामकाज सुलभ होण्याकरिता कृषी सहायकांना सुविधा देण्याची मागणी कृषी सहायक संघटनेने राज्याच्या कृषी आयुक्ताकडे नुकतीच केली आहे.

शासन निर्णयामध्ये व्यक्तिगत खातेदार व संयुक्त खातेदार यासाठी स्वतंत्र याद्या देण्यात आल्या आहेत. यापैकी संयुक्त खातेदार यादीमध्ये नमूद खातेदारांपैकी एखादा गट नंबरमधील संयुक्त खातेदार कोण-कोण आहेत, याबाबतची महसूल विभागाकडून माहिती निश्चित केल्याशिवाय अनुदान वर्ग करण्याची कारवाई करणे शक्य होणार नाही.

संयुक्त खातेदाराच्या याद्या ग्रामस्तरावर प्रसिद्ध केल्यास कृषी सहायकांना शेतकऱ्यांच्या रोशास सामोरे जावे लागेल. यामुळे राज्यातील कृषी सहायक सद्यःस्थितीत फक्त व्यक्तिगत खातेदारांच्या माहिती संकलनाचे काम करणार आहेत.

राज्यात अनेक कृषी सहायकाकडे दोन गावांपासून ते १५ ते १६ गावांपर्यंतचा कारभार आहे. एका गावामध्ये साधारण दोन हजार पर्यंत लाभार्थी आहेत व हे सर्व काम करण्यासाठी एकटा कृषी सहायक असल्याने त्यासाठी वेळ लागणार आहे. याबाबत मुदतवाढ मिळणे आवश्यकआहे.

ग्रामस्तरावर कामाचा सर्व डेटा गोळा झाल्यानंतर याद्या संगणकीकृत करण्याकरता कृषी सहायकाकडे कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. याबाबत कृषी सहायक संघटनेने गेल्या गेल्या पाच वर्षांत अनेकवेळा कृषी सहायकांना लॅपटॉप देण्याची मागणी केली. परंतु ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

यामुळे राज्यातील अकरा हजार कृषी सहायक नाराज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या योजनेचे सद्यःस्थितीत या योजनेचे संगणकीकरण करण्याचे काम कृषी सहायक करणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राज्याध्यक्ष संदीप केवटे, कार्याध्यक्ष विलास रिंडे, कोषाध्यक्ष वसंत जारीकोटे, सरचिटणीस सोमनाथ बाचकर यांच्य स्वाक्षऱ्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT