Rural Economy Challenges due to El Nino: या वर्षी पाऊस लांबला, तो देखील कमी पडणार आहे. याचा एकंदरीतच राज्याच्या आणि देशाच्या खरिपातील प्रमुख पीक लागवडीवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. देशात कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक असून, ते पूर्णपणे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. कोरडवाहू शेतीत प्रामुख्याने अन्नधान्य पिके घेतली जातात. कमी पाऊस म्हणजे कोरडवाहू शेती पर्यायाने अन्नधान्य पिके धोक्यात येऊन त्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे..कमी पाऊसमान, बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव, शिवाय कापसाला मिळत असलेल्या कमी दरामुळे उत्तर भारतात कापसाची लागवड २२ टक्क्यांनी घटली आहे. ऊस, मका ही अधिक पाणी लागणारी पिके टाळून शेतकरी सोयाबीन लागवडीला पसंती देत असल्याचेही दिसून येत आहे. कमी पाऊसमानाबरोबर मागील काही वर्षांपासून आणि चालू खरीप हंगामात भाव काय मिळेल, याचा अंदाज घेऊनही शेतकरी पिकांची निवड करीत आहेत. एकंदरीतच या वर्षी खरीप हंगामात पीक लागवडीतील मोठा बदल पाहता अन्नसुरक्षा, चारापुरवठा आणि शेतीमाल आधारित उद्योग या सर्वांवर परिणाम होण्याची शक्यता आहे..El Nino Crisis: ‘एल निनो’ आणि कोरडा उपदेश.ज्या पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली त्यांचे उत्पादन कमी मिळणार, यात शंकाच नाही. परंतु सोयाबीनसारख्या पिकाचे लागवड क्षेत्र वाढले तरी उत्पादन वाढेल की नाही, हे पूर्णपणे येथून पुढील पावसाच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे. सोयाबीनला मे महिन्यात जवळपास साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सोयाबीनचा हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आहे. पेरणीच्या तोंडावर गेल्या चार वर्षांतील विक्रमी भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे वाढण्याची चिन्हे आहे..या उलट मक्याला मात्र हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. मका, सोयाबीन ही जागतिक बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची पिके आहेत. मका हे पीक खाद्यान्नापेक्षा पशुपक्षी खाद्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. मका लागवड क्षेत्र तसेच उत्पादन घटीने पोल्ट्री खाद्याचे दर वाढू शकतात. मुळातच पोल्ट्री खाद्याचे दर अधिक आहेत, त्यात अजून दरवाढ झाली तर त्याचा मोठा फटका या व्यवसायाला बसू शकतो. सोयाबीन उत्पादन वाढले तर आपले सोयातेल आयातीवरील अवलंबित्व काही अंशी कमी होऊ शकते..Climate Change Agriculture: बदल गांभीर्याने घ्या.एल निनोचा मॉन्सूनवरील परिणाम हा केवळ भारतापुरता मर्यादित नाही. तर इंडोनेशिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि मध्य अमेरिका, आफ्रिकेचा पूर्व भाग या देशांनाही मोठा फटका बसणार आहे. याउलट पेरू, इक्वेडोर, मध्य व दक्षिण अमेरिकेचा आग्नेय भाग, मध्य पूर्व आशियातील लेबेनॉन, सीरियासारख्या देशांत अतिवृष्टी आणि महापुराने नुकसान होऊ शकते. कोरोना आणि त्यानंतर सातत्याच्या युद्धजन्य परिस्थितीने जगभर अन्नसुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आहेच..अशा वेळी एल निनोमुळे होणाऱ्या कमी-अधिक पाऊसमानामुळे अन्नधान्य उत्पादन घटून बहुतांश देशांची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते. या सर्व बाबींचा सारासार विचार करून देशातील शेतकऱ्यांना या परिस्थितीमध्ये तग धरून राहण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत. वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्ती तसेच आयातनिर्यातीची धोरणे या आघाड्यांवर शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी दीर्घकालीन विचार करायला हवा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.