Pune Market Committee: तरकारी बाजार रात्री ११ वाजता सुरू करा; आडतदारांची पुणे बाजार समितीकडे मागणी
Traders Demand: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील घटता आणि विस्कळीत होत चाललेला व्यापार सुरळीत करण्यासाठी तरकारी विभागातील बाजार रात्री ११ वाजता सुरू करावा, अशी मागणी आडतदार बांधव कृती समिती आणि श्री शारदा गजानन आडते असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.