Cotton, Soybean Subsidy : कापूस, सोयाबीनसाठी ५ हजार रुपये, दुधासाठी अनुदान; वीजबिल माफी

Maharashtra Budget Session 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, महिलांसह सर्वच घटकांना खूश करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या. पण कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी केली.
Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024Agrowon

Pune News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी, महिलांसह सर्वच घटकांना खूश करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या. पण कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी केली. मात्र या अर्थसंकल्पात दादांनी शेतकऱ्यांसाठी कापूस, सोयाबीनसाठी हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान, दूधाला ५ रुपये अनुदान, वीज बील माफी, बांबूच्या रोपांसाठी अनुदान जाहीर केले. महिलांसाठीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षणासह महत्वाच्या योजना जाहीर केल्या.

सर्वात महत्वाची घोषणा आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाची. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किंमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली.

राज्यात सध्या दुधाचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकरी चांगल्या भावासाठी आंदोलन करत आहेत. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै २०२४ पासून पुढे चालू ठेवण्यात येईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. तर आतापर्यंत दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांप्रमाणे २२३ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वितरित केल्याचेही त्यांनी सांगितले.

बांबू लागवडीला सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी अटल बांबू समृद्धी योजनेतून १० हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरीता प्रतिरोपासाठी १७५ रूपये अनुदान देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 : 'लबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही', अर्थसंकल्पावरून विरोधकांची सरकारवर जोरदार टीका

विजेसंदर्भातही अर्थमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांचे थकीत वीजबिल माफ करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी “मागेल त्याला सौरउर्जा पंप” या योजनेअंतर्गत एकूण ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही २५ हजार रुपयांवरून ५० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. पशुधन हानीच्या नुकसान भरपाईतही भरीव वाढ करण्यात आली आहे.

Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र? दरमहा मिळणार १५०० रुपये

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी झाल्यास द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत २० लाख रुपयांवरून २५ लाख रुपये, त्यात कायमचे अपंगत्व आल्यास ५ लाख रुपयांवरून ७ लाख ५० हजार रुपये, गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजारावरून ५ लाख रुपये, किरकोळ जखमी झाल्यास २० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये अशी वाढ करण्यात आली आहे.

या सोबतच शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी इतरही काही योजना जाहीर केल्या. त्यात गाव तेथे गोदाम, कापूस आणि सोयाबीन उत्पादकता वाढ योजना, दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन प्रकल्प, सिंचन प्रकल्प, नदीजोड प्रकल्प आदी घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या.

महिलांसाठीही काही महत्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” - २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा १,५०० हजार रुपये मिळणार. दरवर्षी सुमारे ४६ हजार कोटी रुपये निधी मिळणार.

मुलींना मोफत उच्च शिक्षण- शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषि विषयक सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रूपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. याचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ होणार आहे.

“मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना”- वर्षाला घरटी तीन गॅस सिलेंडर मोफत देणार- ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना लाभ मिळणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com