Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Blossom Drop Issue : ढगाळ वातावरणामुळे मोहर गळतीमध्ये वाढ

Weather Impact : डहाणू तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहर, भाजीपाला, शेवगा, वाल आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसत आहे.

Team Agrowon

Mumbai News : डहाणू तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहर, भाजीपाला, शेवगा, वाल आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसत आहे. याआधीच पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहर गळतीची समस्या वाढली आहे. त्यामुळे बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

आंब्याला मोहर लागल्यानंतर वातावरण ढगाळ झाल्यास तो गळून पडतो. यंदा आंब्याला कमी मोहोर आल्याने उत्पादनावर आधीच मर्यादा आली आहे. आता या फुलगळतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढले आहे.

याशिवाय भाजीपाला व हरभऱ्याच्या पिकांचीही वाढ मंदावली असून शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. भाजीपाला विक्रीतून मिळणारे उत्पन्न हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा आधार बनला आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे या उत्पन्नावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदलत्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसानीचे प्रमाण अधिक वाढण्याची भीती आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे आंबा मोहोर गळण्याची भीती आहे. यंदा आंब्याला कमी मोहोर आला होता. पुढील दोन-तीन दिवस असेच वातावरण राहू शकते, असे हवामान विभागाचे संकेत आहेत. शेतकऱ्यांनी किडी व रोग नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि योग्य फवारणी करणे गरजेचे आहे.
डॉ. उत्तम शहाणे, शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT