Maharashtra Drought : सोलापूर जिल्ह्यात सध्या पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. ग्रामीण भागात शेतकरी व पशुधन अडचणीत आले असून, गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने तातडीने टंचाई व दुष्काळ आढावा घेण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केली. यावर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी विशेष सभा घेण्याचे नियोजन नाही, पण याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले..Soybean Crop Crisis: औंदा सोयाबीनच्या सुगीच कामच नाही.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात शेतकरी व पशुधन अडचणीत आले आहे. .Agriculture Crisis : पिके करपली; चाऱ्यासाठी ऊस विकण्याची वेळ.काही ठिकाणी तलाव तसेच गावातील पाणवठ्यांमध्ये अतिरिक्त पाणी उपसा सुरू असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. लहान-मोठ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. जिल्हा परिषदेने तातडीने बैठक घेऊन सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावे, तसेच ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, अशी मागणी केली आहे. .जिल्हा परिषदेला १५ व्या व १६ व्या वित्त आयोगातून प्राप्त होणारा निधी लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या आधारे वाटप केला जातो. मात्र, मागील सहा महिन्यांपासून आपल्या मतदारसंघाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळालेला नसल्याने विकासकामांवर परिणाम होत असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.