Mango Blossom : प्रतिकूल हवामानामुळे यंदा आंबा मोहोर दोन-तीन टप्प्यांत

Climate Impact on Mangoes : उशिरापर्यंत झालेला पाऊस, पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत टिकून राहिलेली ओल, कमी थंडी आणि ढगाळ वातावरण, पाऊस आदी प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया दोन-तीन टप्प्यांत होणार आहे.
Mango Blossom
Mango BlossomAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : उशिरापर्यंत झालेला पाऊस, पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत टिकून राहिलेली ओल, कमी थंडी आणि ढगाळ वातावरण, पाऊस आदी प्रतिकूल स्थितीमुळे यंदा आंबा मोहोर येण्याची प्रक्रिया दोन-तीन टप्प्यांत होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ आंबा फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दिली आहे.

प्रतिकूल हवामानामुळे आंबा बागांत मोहोर येण्याचे प्रमाण असंतुलित असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत. कोकण वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात आंबा बागांची हीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगर, नगर, नागपूर, अमरावती, वर्धा येथील बागांचा नुकताच दौरा केला.

या पार्श्वभूमीवर डॉ. कापसे यांच्याशी संवाद साधला. या वेळी डॉ. कापसे यांनी राज्यभरातून शेतकरी आंबा मोहोर तसेच व्यवस्थापनासंबंधी माहिती विचारण्यासाठी संपर्क साधत असल्याचे सांगितले.

Mango Blossom
Mango Orchard Management : प्रतिकूल परिस्थितीत आंबा बागेत घ्यावयाची काळजी

डॉ. कापसे म्हणाले, की यंदा उशिरापर्यंत पाऊस झाला. पावसाळा संपल्यानंतरही जमिनीत भरपूर ओल राहिली. त्यामुळे पॅक्लोब्युट्राझोल या वाढ नियंत्रकाचा वापर केलेल्या आंबा बागांमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मोहोर यायला पाहिजे होता, तो केवळ ५ टक्केच आला.

त्यानंतर थंडी कमी राहिली, त्यामुळे आतापर्यंत केवळ ५० ते ६० टक्के मोहोर बाहेर पडला आहे. याशिवाय जमिनीतील ओलाव्यामुळे झाडांना पालवीदेखील आली आहे. त्यानंतर लगेच ढगाळ वातावरण राहिल्याने मोहोर येण्यास अटकाव झाला. अशा स्थितीत यंदा मोहोर येण्याची प्रक्रिया दोन-तीन टप्प्यांत होईल. मोहोरांतील बागांचे व्यवस्थापन करण्यासंबंधीचा सल्ला सोमवारी (ता. ९) रोजी ‘ॲग्रोवन’मध्ये पान १४ वर प्रसिद्ध झाला आहे.

Mango Blossom
Mango Blossom : बोर्डीमध्ये प्रतिकूल वातावरणामुळे मोहोर लांबणीवर

गुच्छा रोगावर नियंत्रण शक्य

आंब्यांचे रोप तसेच झाडांवर गुच्छा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास तो गंभीर ठरू शकतो. हा रोग पानावर तसेच मोहारामध्ये येतो. गुच्छा रोग ही एक विकृती आहे, असा आतापर्यंत सगळ्यांचा समज होता. मात्र, हा रोग बुरशीमुळे होतो. फ्युजारियम मोनोलिफॉर्मी असे या बुरशीचे नाव आहे. मोहोरातील (फ्लोरल) गुच्छा अधिक गंभीर ठरतो.

त्यामुळे ५० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते. नियंत्रणासाठी मोहोर आलेली फांदी प्रादुर्भावग्रस्त जागेपासून एक-दीड फूट मागून कापावी. दूर नेऊन ती जाळून टाकावी. वर्षभरापर्यंतच्या नवीन लागवड केलेल्या झाडांवर प्रादुर्भाव झालेला असेल तर झाडच उपटून टाकून त्या ठिकाणी नवीन चांगल्या रोपाची लागवड करणे फायदेशीर आहे. प्रादुर्भावग्रस्त फांद्या काढून त्यांची विल्हेवाट लावावी व कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार नियंत्रण कारावे असा सल्ला डॉ. भगवानराव कापसे यांनी दिला.

‘नवतीऐवजी मोहराला द्या ताकद’

‘‘आंबा बागेत ढगाळ वातावरणात नत्र वाढते, तर कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. म्हणजे नवती निघून मोहोर निघणे थांबते. मोहोर आणि नवतीत निघण्याची स्पर्धा होते. मोहोर ताकदवान असेल तर पाने बारीक निघतात आणि मोहोर जरा बाहेर पडला की ती पाने गळून पडतात. मात्र, पाने ताकदवान असल्यास मोहोर कमकूवत होतो आणि बाहेर पडल्यानंतर तो गळून जातो. त्यामुळे मोहोर ताकदवान होण्यासाठी किंवा नवतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड या वाढ नियंत्रकाचा

दीड ते दोन मिली प्रति लिटर प्रमाणात वापर करावा. त्यामुळे नवतीची ताकद कमी होऊन मोहोर वाढीस मदत होते. अशा प्रकारे डिसेंबरमध्ये संपूर्ण मोहोर आणला गेला, तर एप्रिलमध्ये फळ काढणीस येऊ शकते. त्यामुळे चांगले उत्पादन, दर मिळू शकतो,’’ असेही डॉ. भगवानराव कापसे म्हणाले.

‘बागेला आच्छादन करून घ्यावे’

‘‘शेतकऱ्यांनी सध्या आंबा बागेत झाडांना बोर्डो पेस्ट लावून घ्यावी. खते देऊन त्यावर उसाचे पाचट, भुस्कटाचे अच्छादन करून घ्यावे. अच्छादन केल्यानंतर त्यावर थोडी माती ओढावी, जेणेकरून अच्छादन वाऱ्याने इतरत्र जाणार नाही. अच्छादनापूर्वी खते टाकावीत. वाळवी लागू नये म्हणून या आच्छादनावर क्लोरोपायरीफॉस या कीटकनाशकाचा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार व शिफारसीनुसार वापर करावा,’’ असेही डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com