Sugarcane FRP: स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ‘सी-२ अधिक ५० टक्के’ सूत्रावर आधारित उसाला प्रतिटन सहा हजार ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा साखर कारखाने सुरू करू देणार नाही, असा निर्धार महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात करण्यात आला..राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मेळाव्यास अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, राज्य सचिव गिरीश फोंडे, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .Farmers Demand: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर करा.क्षीरसागर यांनी सध्याचे सरकार उद्योगधार्जिणे असल्याचा आरोप करत, कॉर्पोरेट कंपन्यांच्या डेटा सेंटरसाठी शेतकऱ्यांचे पाणी वळविले जात असल्याचे सांगितले. ऊसदर ठरविताना शेतकऱ्यांशी चर्चा करावी, तसेच साखरेच्या उत्पादनाबरोबर मळी, बगॅस, वीज आणि इथेनॉलमधून होणाऱ्या मूल्यनिर्मितीतील ७५ टक्के वाटा शेतकऱ्यांना द्यावा, .Farmers Demand: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या : प्रशांत डिक्कर .अशी मागणी त्यांनी केली. गिरीश फोंडे यांनी १५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. ऊस अद्याप अपरिपक्व असल्याने लवकर गाळप सुरू करायचे असल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली..मेळाव्यात साखरेची किमान विक्री किंमत ५० रुपये किलो करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करून निधी दुष्काळग्रस्त भागांसाठी वापरावा, यासह विविध ठराव मंजूर करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.