Winter Season
Winter SeasonAgrowon

Maharashtra Rain Alert : दोन दिवस काही भागांत पावसाची शक्यता; ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये घट

Maharashtra Rain Forecast : राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली. तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
Published on

Pune News : राज्यातील थंडी मागील दोन दिवसांपासून कमी झाली. तसेच पावसाला पोषक हवामान होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

तर गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला. त्यामुळे राज्याच्या किमान तापमानात चढ उतार राहतील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली उद्यापर्यंत उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाकाही कमी - अधिक होत आहे.

Winter Season
Maharashtra Weather : अंशतः ढगाळ हवामानासह तापमानात चढ - उतार शक्य

आज पंजाबमधील अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. म्हणजेच उत्तर भारतात देखील किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. मात्र उत्तर भारतात आजही बहुतांशी ठिकाणी कायम आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाट होती.

राज्यात आज म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवारी काही भागात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तर त्यामुळे तापमानात चढ उतार राहतील. तर गुरुवारी पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये काही भागात ढगाळ हवामान राहून हलक्या पावसाची शक्यता आहे.

Winter Season
Weekly Weather : तीव्र थंडी कायम; ढगाळ हवामान शक्य

तर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.

तसेच शुक्रवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

तर धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com