प्रमोद बोडकेCrop Crisis : सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळ्यात पर्जन्यमानाची मोठी तफावत दिसून आली आहे. ३० सप्टेंबर २०२६ अखेरच्या महसूल मंडलनिहाय आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९८ महसूल मंडलांपैकी तब्बल ५६ मंडलांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक महसूल मंडले सरासरी पावसाच्या निम्म्यापर्यंतही पोचलेली नाहीत. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरी २११.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोलापूरची सरासरी ४३४ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत यंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ४८.६ टक्के पाऊस झाला आहे. .जिल्ह्यातील काही मंडलांमध्ये पावसाने सरासरीच्या जवळपास किंवा त्यापेक्षा अधिक हजेरी लावली आहे. मात्र, अनेक भागांत पावसाची तूट कायम राहिली. विशेषतः पंढरपूर, माढा आणि मोहोळ तालुक्यांतील प्रत्येकी सात महसूल मंडलांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या मंडलांमध्ये समावेश आहे. अक्कलकोटमधील सहा, तर दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यांतील प्रत्येकी पाच मंडले या यादीत आहेत..Maharashtra Monsoon: पावसाचा जोर ओसरला.उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे मंडलात २८.९ टक्के, मार्डीमध्ये ४९.५ टक्के, सोलापूरमध्ये ४५.४ टक्के आणि बाळे मंडलात १४.१ टक्के पाऊस झाला. दक्षिण सोलापूरमध्ये वळसंग ४८.८, होटगी ३१.२, मुस्ती ४९.९, विंचूर ४६ आणि औरादमध्ये अवघा ७.९ टक्के पाऊस नोंदला आहे. बार्शी तालुक्यात वैराग, पानगाव, सुर्डी, खांडवी आणि सौंदरे या पाच मंडलांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. अक्कलकोटमध्ये अक्कलकोट, जेऊर, तडवळ, दुधनी, वागदरी आणि चपळगाव या मंडलांचा समावेश आहे..Rain Forecast: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता.मोहोळ तालुक्यातील कामती बु., टाकळी सिकंदर, पेनूर, वाघोली, नरखेड, सावळेश्वर आणि शेटफळ या सात मंडलांत पाऊस निम्म्यापेक्षा कमी राहिला. माढ्यात माढा, दारफळ, म्हैसगाव, टेंभुर्णी, मोडनिंब, लऊळ आणि निमगाव टें. या मंडलांचा समावेश आहे. करमाळा तालुक्यात केवळ जिंती मंडलात १३.९ टक्के पाऊस झाला. पंढरपूर तालुक्यात भंडीशेगाव, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, चळे, तुंगत आणि खर्डी या सात मंडलांत सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. खर्डीमध्ये अवघा १.८ टक्के पाऊस नोंदला गेला आहे. सांगोला तालुक्यात शिवणे, जवळा, सोनंद, महूद आणि संगेवाडी; माळशिरस तालुक्यात माळशिरस, अकलूज, लवंग व वेळापूर; तर मंगळवेढा तालुक्यात बोराळे, मरवडे, मारापूर, भोसे व पाटकळ या मंडलांचा समावेश आहे..सर्वाधिक पावसाची नोंदमाढा तालुक्यातील रांजणी महसूल मंडलात सर्वाधिक ४२८.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तेथील पर्जन्यमान सरासरीच्या ९०.३ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पावसाचे वितरण किती विषम राहिले, हे या आकडेवारीतून स्पष्ट होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी पर्जन्यमापकाबाबत यापूर्वीही आक्षेप घेतला आहे. गावात व परिसरात पाऊस नसताना एवढा पाऊस कसा काय नोंदविला गेला, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत. येत्या काळात या प्रश्नाचा आवाज आणखी मोठा होण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.