Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Result 2024 : जळगाव, रावेर मतदार संघांत भाजपने गड राखला

Election 2024 : खानदेशातील जळगाव, रावेर या लोकसभा मतदार संघात भाजपने विजय मिळविला आहे. तर नंदुरबार, धुळे मतदारसंघ गमावला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशातील जळगाव, रावेर या लोकसभा मतदार संघात भाजपने विजय मिळविला आहे. तर नंदुरबार, धुळे मतदारसंघ गमावला आहे. धुळे मतदारसंघात डॉ. सुभाष भामरे यांचा ११,५२४ मतांनी पराभव झाला आहे.

नंदुरबारात काँग्रेसचे अॅड. गोवाल पाडवी यांनी प्रथमच लोकसभेची निवडणूक लढली व पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. ते एक लाख १० हजार ७२४ मतांनी विजयी झाले. ते आमदार के. सी. पाडवी यांचे पुत्र असून, त्यांनी राज्याचे मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांची कन्या व सलग दोन वेळेस निवडून आलेल्या खासदार डॉ. हिना गावीत यांचा पराभव केला आहे.

जळगावातून सुरुवातीला भाजपच्या स्मिता वाघ या पिछाडीवर होत्या. पण पुढे त्यांचे मताधिक्य वाढले. त्या दोन लाख ५७ हजार ८५८ मतांनी विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे (उबाठा) करण पवार हे सतत पिछाडीवर राहिले.

रावेरात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही तिसऱ्यांदा विजयश्री खेचली आहे. त्यांना एक लाख ४८ हजार एवढे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे. धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी ११,५२४ मतांनी भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.

शेती प्रश्न एरणीवर

खानदेशात केळी पीकविमा, सिंचनाचा अनुशेष, कापसाला हमीभावापेक्षा कमी दर आदी प्रश्न निवडणुकीत चर्चेत होते. महाआघाडीने हे प्रश्न सतत आपल्या व्यासपीठावर मांडले व हे मुद्दे शेतकरी समाजास पटवून दिले. त्यास मतदारांनी प्रतिसाद दिला व आपला समिश्र कौल खानदेशात दिला.

मतदारसंघ उमेदवार मिळालेली मते

नंदुरबार गोवाल पाडवी (काँग्रेस) तीन लाख ८१ हजार ५४

हिना गावीत (भाजप) दोन लाख ७० हजार ३३०

जळगाव स्मिता वाघ (भाजप) सात लाख चार हजार १९७

करण पवार (शिवसेना, उबाठा) चार लाख ४६ हजार ३३९

रावेर रक्षा खडसे (भाजप)

श्रीराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार)

धुळे शोभा बच्छाव (काँग्रेस)

सुभाष भामरे (भाजप)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT