Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निकालानंतर कोण काय म्हणाले?

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे देशात आणि राज्यात चित्र आता स्पष्ट झाले आहे. यावरून आता राज्यातील प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election Result 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील ४८ जागांसह देशातील ५४३ लोकसभा मतदार संघातील निकाल समोर येत आहेत. यावेळी राज्यातील ४८ मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या. यावेळी समोर आलेल्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शरद पवार यांनी आपली प्रतिक्रियी दिली आहे. तसेच इतर प्रमुख राजकीय नेत्यांसह उमेदवारांनी देखील त्यांच्या प्रतिक्रियाद दिल्या आहेत. 

ठाकरेंचा कार्यक्रम जनतेनं केला

ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खऱ्या शिवसेनेचा खासदार निवडूण देणाऱ्या जनतेचे आभार. नरेश मस्केही १ लाखापेक्षा अधिक लिडवर आहेत. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंद. ठाण्यातील विकासाठी जनतेने मतदान केले. राज्य सरकार आणि मोदींच्या दहा वर्षांतील कामाची ही पोचपावती आहे. त्यामुळे गद्दार म्हणणाऱ्या ठाकरेंचा कार्यक्रम जनतेनं केला. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याने त्यांचे अभिनंदन. लवकरच देशात एनडीएचं सरकार बनेल.

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

आमचा स्ट्राइकिंग रेट चांगला 

महाराष्ट्रातील जनतेचे आभार आणि राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जे निवडणुकीसाठी कष्ट घेतले त्यासाठी त्यांचे अभिनंदन करताना पक्ष आणि संघटनेकडून आभार मानतो. हा निकाल परिवर्तनाला पोषक आहे. “या निवडणुकीत अनेक चांगल्या गोष्टी घडल्या असून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही १० जागा लढवल्या. यात आम्हाला ७ जागांवर आघाडी आहे. १० पैकी ७ जागा हे चित्र स्ट्राइकिंग रेट चांगला दाखवणारा आहे. 

तर आम्हाला मिळालेले एकट्याचे नसून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आमच्या सहकाऱ्यांचे आहे. त्यामुळे येत्या काळातही आम्ही तिघेही एकत्र राहून आमची धोरणं ठरवू आणि जनतेची सेवा करू. 

- शरद पवार 

Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election Results : मतमोजणी प्रक्रियेत काही ठिकाणी बत्तीगुल; काही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

नैतिक जबाबदारीने मोदींनी राजीनामा द्यावा

एकंदरीत निकाल पाहता काँग्रेसची निराशा झाली आहे. पण भाजपला सर्वात जागा मिळाल्याने त्यांना सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले जाऊ शकते. मात्र भाजपने जो आकडा सांगितला होता. तो त्यांना गाठता आलेला नाही. त्यामुळे याची  नैतिक जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा. 

-पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)

जनतेनंच मोदींना हरवलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे स्वत:ला देव समजायचं. पण आता निकालानंतर त्यांचं नाक कापलं गेलं आहे. कापलेल्या नाकानेच ते फिरत आहेत. भाजपचे कमी झालेल्या जागा म्हणजे मोदी यांचा पराभव आहे. त्यामुळे भाजपचा पराभव झाला असून त्यांना बहुमतही मिळवताही आलेले नाही. देशातील जनतेनंच मोदींना हरवलं. भाजपला हरवलं आहे. भाजपने बजरंग बली, श्रीरामाच्या नावाने निवडणूक लढवली. मोदींनी १० वर्षे जनतेला मूर्ख बनवलं. तीच भाजप अयोध्येत आज हारली आहे. मोदींनी ध्यान साधनेचा इव्हेंट केला. त्यांनाच जनतेने नाकारलं आहे

- संजय राऊत 

Lok Sabha Election Result 2024
Kolhapur Lok Sabha Election : कोल्हापुरात मान गादीला अन् मतही गादीला, हातकणंगलेत काटे की टक्कर

पाटील यांच्या बाजूने कौल

सांगलीच्या बाबतीत जे राजकारण झालं त्यावरून सांगलीच्या जनतेनेचं उठाव केला. जनतेनं विशाल पाटील यांच्या बाजूने कौल दिला आहे. माझ्याबाबतीत येथील जय विजय महत्वाचा नव्हता तर जिल्ह्यात काँग्रेस टीकावी हे महत्वाचे होते. त्याप्रमाणे विशाल पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिला होता. तो पाळला. माझ्या शब्दाला सांगलीची जनता आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मान दिला. 

-विश्वजीत कदम

फडणवीसांनी खोके वाटले

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी 'बाप बाप होता है' हे पंतप्रधान मोदी यांना कळले असेल. खरी शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण? हे ही त्यांना समजले असेल. मुंबईत शिवसेनेची ताकद होती आणि आहे हे त्यांना दिसले असेलच. फडणवीसांनी खोके वाटले पण ते जनतेने स्वीकारले नाहीत. 

-सुषमा अंधारे 

Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election : कोल्हापुरात दोन्ही मतदार संघात अत्यंत चुरशीने लढत, शाहू महाराज आघाडीवर

आपण सर्व मिळून जल्लोष करू

छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित होता. कोल्हापुरच्या जनतेनं छत्रपती शाहू महाराजांवर विश्वास दाखवला. शहरांसह ग्रामीण जनतेनं या निवडणुकीत भरभरून छत्रपती शाहू महाराजेंना प्रेम दिलं. ही फक्त सातवी फेरी असून ५० हजारांहून अधिक मताधिक्क्य आहे. ही फक्त सुरूवात आहे. सगळे राऊंड पार पडू द्या मग आपण सर्व मिळून जल्लोष करू. 

- संभाजीराजे छत्रपती

यामुळेच विजय सुकर 

कोल्हापूरच्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने राबवलेल्या प्रचारामुळे हा विजय सुकर होत आहे. तसेच आम्हाला याचा विश्वास होता की, छत्रपती शाहू महाराजांना मताधिक्क्य नक्की मिळेल. सध्याच्या माहितीनुसार महाराजांना ५० हजारांचे लिड आहे. यामुळे विजय निश्चित होईल.

- माजी आमदार मालोजीराजे छत्रपती

Lok Sabha Election Result 2024
Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा आज फैसला

लोकशाही टिकवण्यासाठी मतदान केलं

देशामध्ये भाजप आणि मित्र पक्षांकडून जे सांगितलं जात होतं. जसं वातावरण निर्मिती केली जात होती. तशी परिस्थिती आणि वातावरण सध्या दिसत नाही. तर सुज्ञ नागरिकांनी महत्वाच्या प्रश्नांचा विचारकरून जाणीवपुर्वक लोकशाही टिकवण्यासाठी मतदान केलं आहे. अजूनही ट्रेंड्स सुरू असून उद्धव ठाकरे गटाला यश मिळत आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुन्हा उभारी घेत आहे. 

-अनिल देसाई

तर जनता असा निकाल देते

मागच्या पाच वर्षांपासून मोदींच्या नावाने हिनवले जात होते. पण मला हे सांगायचे आहे की राज्यात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आजही हवा आहे. पण भाजपने उद्धव ठाकरे यांचा विश्वास घात केला. पक्ष फोडला, शिवसेनेचं धनुष्य बाण हे चिन्ह चोरलं. पण लोकांना गृहीत धरणारे राजकारण आवडलेलं नाही. त्यामुळे लोकांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे. आता फक्त १० फेऱ्या झाल्या असून १ लाख २७ हजारांचे लीड आहे. अजून २० फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे हे जबाबदारी वाढवणारे काम असून तेच डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करू. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून जर राजकारण केलात तर जनता असा निकाल देते. 

-  ओमराजे निंबाळकर 

केंद्रीय यंत्रणांचा वापर 

माझा विजय हा उद्धव ठाकरे यांना समर्पित करत आहे. भाजपने ज्या प्रमाणे केंद्रीय यंत्रणांचा वापर केला. त्याला ठक्कर उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यावरून लोकांनी त्यांच्यावर आणि माझ्यावर विश्वास दाखवला. यातूनच हा विजय साकार झाला. 

- अरविंद सावंत

आमच्या कामाला पसंती 

मी याधीच सांगितलं होतं की आम्ही मागील १० वर्षाच्या कामाच्या जोरावर लोकांमध्ये जाऊ. त्याप्रमाणे जनतेसमोर गेलो. लोकांनी आम्हाला आमच्या कामाला पसंती दिली आहे. लोकांनी मोठ्या मताधिक्क्याने मला निवडणुन दिलं. 

- श्रीकांत शिंदे 

सर्वोत्तम शहर पुण्याला करू

हा विजय पुणेकरांसह महायुतीती मित्र पक्षांच्या मेहनीचा आहे. पुणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. तो भविष्यात सार्थ ठरवण्यासाठी काम करणार. तर देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहर करण्यासाठी काम करू. 

- मुरलीधर मोहोळ 

कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ 

हा जनतेचा विजय असून महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षातील रावणाऱ्या कार्यकर्त्याचा हा विजय आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. तर राज्यातील मोठ्या नेत्यांनी आव्हान दिल्यानंतर त्याचे उत्तर माय बाप जनतेनं दिले आहे. दुसऱ्यांदा खासदार जनतेनं केलं आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे.  

-डॉ अमोल कोल्हे

सिंचनासह प्रलंबित प्रश्नावर काम

तिकीट जाहीर झाल्यापासून विकासाच्या मुद्दा घेऊन जनतेच्या समोर गेले. आम्ही आमच्या कामावर आणि जनतेवर विश्वास ठेवला. तसेच कार्यकर्ते, नेते पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळेच विजय निश्चित झाला. मतदारांच्या विश्वासाबद्दल आभार. आता जिल्ह्यातील सिंचनासह प्रलंबित प्रश्नावर काम करण्यासह नवीन उद्योग आणण्यासाठी काळात काम करणार.

-स्मिता वाघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com