Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा आज फैसला

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत झालेल्या मतमोजणीसाठी राज्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. आज (४ जून) ४८ मतदार संघात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Agrowon

Lok Sabha Election Result Update : लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत झालेल्या मतमोजणीसाठी राज्यात यंत्रणा सज्ज झाली आहे. आज (४ जून) ४८ मतदार संघात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. राज्यातील ४८ मतदार संघांतील मतमोजणीसाठी ४ हजार ३०९ टेबलवर मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजेपर्यंत कल लक्षात येणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत देशात कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

Lok Sabha Election
Lok Sabha Election : पुणे जिल्ह्यात मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

राज्यातील ४८ मतदार संघांतील मतमोजणी केंद्रांवर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी २८९ हॉलमध्ये ४ हजार ३०९ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यात काही ठिकाणी संवेदनशील मतदार संघ असून तेथे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. बीडमध्ये काही जणांना ताब्यात घेतले असून तेथे मराठा विरुद्ध वंजारी असा तणाव निर्माण झाला आहे. मुंबईतही यंत्रणा तैनात केली असून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

मुंबईतील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रावर मतदान यंत्रातील (ईव्हीएम) प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये कांदा आणि टोमॅटोच्या माळा गळ्यात घालून निषेध तर मेहुणे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

तसेच टपाली मतमोजणीसाठी एका लोकसभा मतदार संघासाठी १४ टेबल व सेवा मतदारांच्या पूर्वमतमोजणीसाठी दोन स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यांनतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने ५ जूनच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शिवडी येथील मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटरच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई जारी करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com