Food Department agrowon
ॲग्रो विशेष

Food Department : अन्न भेसळ विभागाची मोठी कारवाई, अडीच लाखांचा साठा जप्त

Food Department Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या काळातच मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

sandeep Shirguppe

Adulteration Department Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात ऐन सणासुदीच्या काळातच मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दसरा दिवाळी निमीत्त मोठ्या प्रमाणात दूग्धजन्य पदार्थांची विक्री होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत आठ उत्पादकांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून २ लाख ५२ हजार ४५२ रुपयांचा अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री होते. याचा फायदा घेऊन अनेक व्यापारी, उत्पादक, विक्रेत्यांकडून फसवणूक होते. ही फसवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविली.

या तपासणीत मिठाई, रवा, आटा, मैदा, खवा, मसाले, खाद्यतेल यांच्यावर विशेष लक्ष्य केंद्रित केले होते. त्यानुसार आठ उत्पादकांच्या उत्पादनात भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडील सुमारे अडीच लाखांचा सुमारे ६ हजार ३४२ किलोग्रॅम वजनाचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त केला. अन्न पदार्थांचे नमुने घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यामध्ये दोष आढळल्यास उत्पादकांवर कायदेशीर कारवाई किंवा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) तुषार शिंगाडे यांनी सांगितले.

निम्न दर्जाच्या पदार्थांचे मिश्रण

एखाद्या उच्च प्रतीच्या खाद्यपदार्थांत निम्न दर्जाच्या पदार्थांचे मिश्रण करण्याचे प्रकार होतात. त्याचा संशय आल्यामुळे उत्पादक, विक्रेत्यांकडील पदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जातात. तसेच लेबलमध्ये नियमाप्रमाणे अपेक्षित माहिती, तारीख याचा उल्लेख नसल्यामुळे तेही खाण्यास अयोग्य ठरविले जातात. त्यामुळे ही कारवाई करून खाद्यपदार्थ जप्त केले असल्याचेही अन्न व औषध प्रशासन विभागातून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT