Sugarcane Rate Kolhapur : जवाहर साखर कारखान्यासह ५ कारखाने देणार १०० रूपये, पाहा कारखानानिहाय यादी

Sugarcane Rate : ऊस दर कोंडी फुटल्यानंतर शंभर रुपये देणाऱ्या कारखान्यांमध्ये जवाहर, दत्त, शरद आणि गुरुदत्त या चार कारखान्यांसह अथणी शुगर (शाहूवाडी) कारखान्यांचा समावेश आहे.
Sugarcane Rate Kolhapur
Sugarcane Rate Kolhapuragrowon
Published on
Updated on

Sugar Factories in Kolhapur : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर जिल्ह्यातील २१ पैकी पाच कारखान्यांकडून गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील प्रतिटन शंभर रुपये आणि १५ कारखान्यांकडून पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत.

यामध्ये, ऊस दर कोंडी फुटल्यानंतर शंभर रुपये देणाऱ्या कारखान्यांमध्ये जवाहर, दत्त, शरद आणि गुरुदत्त या चार कारखान्यांसह अथणी शुगर (शाहूवाडी) कारखान्यांचा समावेश आहे.

कारखाना निहाय दर आणि जादा मिळणारे रुपये

जवाहर (हुपरी) २९००, १०० रुपये, दत्त (शिरोळ) २९५०, १०० रुपये, शरद (नरंदे) २९००, १०० रुपये, गुरुदत्त (टाकळीवाडी) २९००, १०० रुपये, अथणी शुगर (शाहूवाडी) २९००, १०० रुपये, वारणा (वारणानगर) ३०२५, ५० रुपये, संताजी घोरपडे (सेनापती कापशी)३०५०, ५० रुपये, डी. वाय. पाटील (गगनबावडा) ३०५०, ५० रुपये, पंचगंगा (इचलकरंजी) ३१००, ५० रुपये.

छत्रपती राजाराम (कसबा बावडा) २९००, १०० रुपये, बिद्री (बिद्री) ३२०९, ५० रुपये, सदाशिवराव मंडलिक (हमिदवाडा) ३०००, ५० रुपये, कुंभी-कासारी (कुडित्रे) ३१५०, ५० रुपये, छत्रपती शाहू (कागल) ५० रुपये, ओलम (चंदगड) ३००८, ५० रुपये, अर्थव-दौलत (चंदगड) ३००१, ५० रुपये, इको शुगर, ५० रुपये, दालमिया शुगर (आसुर्ले-पोर्ले) ३१७४, ५० रुपये, अथणी शुगर (तांबाळे) ५० रुपये, भोगावती (परिते) ३१००, ५० रुपये, आजरा (आजरा) ५० रुपये.

जिल्हाधिकारी यांनी सादर केले पत्र

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार, याबाबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतकऱ्यांना मिळालेल्या उसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरु झाली होती.

त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतकऱ्यांना उसाचा दर प्रती टन ३ हजारपेक्षा कमी ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे त्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना १०० रुपये अतिरिक्त प्रती टन द्यावे.

Sugarcane Rate Kolhapur
Raju Shetti : अखेर राजू शेट्टींच्या लढ्याला यश, ऊस दराची कोंडी फुटली, १०० रुपयांवर अखेर तोडगा निघाला

ज्यांनी ३ हजारपेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे त्या साखर कारखान्यांनी ५० रुपये प्रतीटन अतिरिक्त शेतकऱ्यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा व पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी पालकमंत्री, कोल्हापूर जिल्हा यांना दिलेले आहे.

तसेच, दोन महिन्यानंतर वरीलप्रमाणे अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांना साखर कारखान्यांनी देण्याची आहे. तरी सर्व साखर कारखान्यांनी याप्रमाणे आपले संमतीपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आणून द्यावे असे आवाहन सर्व साखर कारखान्यांना पालकमंत्री यांनी केले आहे. या आश्वासनाप्रमाणे जिल्ह्यात चालू असणारे मागील हंगामासाठी वाढीव उसाचे दर मागणी विषयीचे आंदोलन व आजचे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com