Warna Dairy Salary Hike Agrowon
ॲग्रो विशेष

Warna Dairy Salary Hike : वारणा दूध संघाची कर्मचाऱ्यांना भरीव पगारवाढ

Warna Doodh Sangh : कामगारांची पगार वाढ केल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष एच. आर. जाधव, सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, पर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले यांचा सत्कार केला.

Team Agrowon

Kolhapur News : संघाच्या कर्मचाऱ्यांनी सचोटीने कामकाज करत सुमारे १४०० कोटींहून अधिक व्यवसाय करून सर्वच विभागांत प्रगती साधली संघाच्या या उन्नतीमध्ये कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.

त्यामुळे संघाच्या कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सरासरी ३२०० ते ४५०० रुपये भरीव पगारवाढीचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून होणार असल्याची घोषणा वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली.

विज्ञान दिंडीचे वारकरी स्व. विलासदादा कोरे यांच्या ३० व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले, या वेळी संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय झाला कर्मचाऱ्यांना ज्या-त्या विभागात ग्रेडेशनही देण्याचा निर्णय घेणेत आला असून पगारवाढीच्या घोषणेमुळे दूध संघाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कामगारांची पगार वाढ केल्याबद्दल कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष एच. आर. जाधव, सर्व संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, पर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले यांचा सत्कार केला.

या प्रसंगी उपाध्यक्ष एच.आर.जाधव, संचालक मंडळ, प्र.कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, परर्सोनेल मॅनेजर बी. बी. चौगुले, कामगार संघटनेचे प्र. अध्यक्ष सुनील पाटील, कामगार संघटनेचे सचिव लालासो देसाई यांच्यासह संघटनेचे सर्व सदस्य, अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

Modern Fisheries: शेतीला दिली आधुनिक मस्त्यपालनाची जोड

Agro Industry: बचत गटातून मिळाल्या रोजगाराच्या नव्या वाटा

SCROLL FOR NEXT