Modern Fisheries: शेतीला दिली आधुनिक मस्त्यपालनाची जोड
Fish Farming Success Story: कोरोना काळात कुटुंबाचे आर्थिक स्रोत बंद झाल्याने जोर्वे (ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) येथील पुष्पलता केशवराव दिघे यांनी चार एकर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालनाची जोड दिली. पाच वर्षांपूर्वी प्रयोग म्हणून सुरु केलेल्या मत्स्यपालनाचा आता विस्तार झाला आहे. आधुनिक तंत्राच्या मत्स्यपालनाने कुटुंबाला आर्थिक स्थिरता आणि ओळख मिळवून दिली आहे.