Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्यांचे रणांगण तापलं, सभासदांच्या साखर विक्री दरावरून विरोधकांचा आरोप

Kolhapur Bidri Sugar : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी प्रचारात रंगत येत असल्याचे दिसून येत आहे.

sandeep Shirguppe

Bidri Sugar Factory Election : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक सभासद असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाची तारीख जशी जवळ येईल तशी प्रचारात रंगत येत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या कित्येत वर्षांपासून मेहुण्या पाहुण्यांची साथ असलेल्या के पी पाटील आणि ए वाय पाटील यांची युती तुटल्याने बिद्री कारखान्याच्या निवडणुकीतील विरोधक प्रकाश आबिटकरांना ताकद मिळाली आहे.

यामुळे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत प्रचाराचा जोरदार धुरळा उडत असताना एकमेकांवर टीकाही होते आहे.

राधानगरीचे आमदार प्रकाश आबीटकर यांनी जोरदार टीका करताना म्हणाले की, बिद्री साखर कारखान्याचे खरे मालक ऊस उत्पादक सभासद आहेत. या सभासदांना अनेक वर्षे पिठीयुक्त साखर देण्याचे महापाप अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.

निवडणुकीच्या तोंडावर हेच विद्यमान अध्यक्ष साखरेचा दर २० रुपयांवरून १५ रुपये कमी करण्याचे आश्वासन प्रचार प्रारंभावेळी करीत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देणाऱ्या नेत्यांना सभासद योग्य जागा दाखवतील, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.

आमदार आबिटकर म्हणाले, 'के. पी. पाटील यांनी एकाधिकारशाहीचा वापर करत स्वहित साधण्याचा प्रयत्न केला. कारखान्याच्या अनेक चुकीच्या बाबींवर लेखापरीक्षणातून ताशेरे ओढले आहे. यावर न बोलता 'लय भारी'ची टिमकी वाजविण्यात ते मश्गुल आहेत. अध्यक्ष के. पी. पाटील यांनी सत्ता असताना काय केले यांचे उत्तर द्यावे. असे आबीटकर यांनी खुले आव्हान दिले.

सतेज पाटलांची के. पी. पाटीलांना साथ

सहकार आणि विशेषतः साखर कारखानदारीतील के. पी. पाटील जाणते नेतृत्व आहे. माझ्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा मुहूर्तही त्यांनीच काढला होता. प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठीही के. पी. पाटील यांनी योग्य मुहूर्त काढला आहे. निवडणुकीत विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभव होईल, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

आमदार पाटील म्हणाले, 'एफआरपीची किंमत कितीही ठरवू दे. के. पी. पाटील यांनी मात्र बिद्रीचा दर नेहमीच राज्यात उच्चांकी दिला. नोकर पगार, बोनस यातही ते कधी कमी पडताना दिसले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी महालक्ष्मी आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

बिद्रीच्या रथाची दोरी के. पी. पाटील यांच्या हातात सुरक्षित आहे. उसाला जास्तीत जास्त दर देण्याचे काम के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिद्री कारखाना करेल. त्यामुळे त्यांच्याकडे एकमुखी सत्ता देणे काळाची गरज आहे. 'बिद्री'ची सत्ता पुन्हा के. पी. पाटील यांच्याकडेच राहील.'

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT