Nashik News: फ्लेम ऑफ द फायर, असे खुद्द इंग्रजांनी ज्यांचे वर्णन केले आहे तो पळस सध्या चोहीकडे मोठ्या प्रमाणात बहरला आहे. लाल केशरी आणि किंचित पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची झाडे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत..शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वासातांची चाहूल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण,रंगोत्सव सुरु होतो निसर्गाचा..Flame of forest: पळसाला विदर्भाचा ट्युलीप का म्हणतात? .शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. झाडाच्या प्रत्यके फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे दिसत आहेत..Sugarcane Flowering: उभ्या उसाला फुटले तुरे.२० ते २५ फुट उंच असणाऱ्या पळसाला संस्कृतमध्ये पलाश म्हणतात. याचा अर्थ फुलांनी डवरलेले झाड असा होतो..पळसाची फुले मुद्दाम भक्तिभावाने वापरले जातात. ‘कुठेही गेले तरी पळसाची पाने तीन’ अशी म्हण प्रचलित आहे. पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासून मोठ्या पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.