Kolhapur Police : चक्काजाम आंदोलन प्रकरण, राजू शेट्टींसह 2 ते 2500 जणांवर गुन्हा दाखल

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Kolhapur Police
Kolhapur Policeagrowon

Raju Shetti Sugarcane Protest : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह तब्बल अडीच हजार कार्यकर्त्यांवर कोल्हापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेट्टी आणि त्यांच्या सहकार्यांनी गुरुवारी तब्बल ९ तास पुणे- बंगळुरू महामार्ग रोखल्याने गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोल्हापूर पोलीस दलाच्या शिरोली पोलीस ठाण्यात राजू शेट्टी यांच्यासह २ ते अडीच हजार जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शिरोली पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

यामध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, सागर मादनाईक, अनिल चव्हाण, राहुल पाटील, अरुण माळी, अशोक ऐतवडे, शाहरुख पेंढारी, शरद पाटील, बंडू पाटील, अजित पवार, यांच्या सह आदिंवर गुन्हे दाखल झाले. याबाबत फिर्याद पोलीस अंमलदार शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे निलेश कांबळे यांनी दिली.

Kolhapur Police
Sugarcane Protest : उसदराची कोंडी फुटली पण शेतकऱ्यांना पैसे मिळणार का? अद्याप एकाच कारखान्याचे हमीपत्र सादर

मुख्यमंत्र्यांचा राजू शेट्टींना फोन

काल आंदोलनापूर्ली राजू शेट्टींनी अंबाबाईचे दर्शन घेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह पुणे बंगळुरु महामार्ग रोखला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

या आंदोलकांची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकारमंत्री यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर कारखानदारांनी राजू शेट्टींच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्याबाबत राजू शेट्टींनी आंदोलकांना माहिती दिली. यावर सध्याकाळी ७ च्या सुमारास शेट्टींनी आंदोलन मागे घेतले.

शाहू महाराज यांचा राजू शेट्टींना पाठींबा

यावेळी आंदोलकांशी संवाद साधत असताना शाहू महाराज म्हणाले, राजू शेट्टी यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून राजू शेट्टी ऊस दराच्या मागणीवरून आंदोलन करत आहेत. परंतु साखर कारखाने दखल घेतली नाही.

सरकारही मध्यस्थी करताना दिसत नाही. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर मध्यस्थी करून मार्ग काढणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तडजोड करावी, असे आवाहन शाहू महाराजांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com