Bidri Sugar Factory Election : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का, लेखापरिक्षणाचे आदेश

Kolhapur Sugar News : प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी यश ३१ ऑक्टोबरला दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
Bidri Sugar Factory Election
Bidri Sugar Factory Electionagrowon
Published on
Updated on

Bidri Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील ६२ हजारांहून अधिक सभासद असलेल्या कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या चार तालुक्यांचा आवाका असलेल्या बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर यांनी ३१ ऑक्टोबरला दिल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, बिद्री कारखान्याच्या पाच वर्षांतील कामकाजाचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची मागणी तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली होती. त्यानुसार साखर आयुक्तांना लेखापरीक्षणाचे आदेश दिले होते.

कारखान्यातील चुकीच्या कामकाजाबाबत १७ मुद्दे उपस्थित केले होते. या अनुषंगाने केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालात गंभीर बाबी उपस्थित झाल्या होत्या.

त्यानुसार चुकीच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याबाबतचा प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे सादर केला होता. या प्राथमिक चौकशीस स्थगिती देण्याची मागणी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे चेअरमन के. पी. पाटील यांनी केली होती. त्यानुसार लेखापरीक्षणास तात्पुरती स्थगिती दिली होती. स्थगितीविरोधात दाद मागण्यासाठी बिद्री कारखाना बचाव कृती समिती शासनस्तरावर प्रयत्नरत होती.

या प्रयत्नांना यश आले असून चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश विभागीय संचालक (साखर) यांना दिले आहेत. त्यामुळे चुकीच्या कामकाजाची चौकशी होणार असून यासाठी विशेष लेखापरीक्षक वर्ग १ चे डी. बी. पाटील यांची नेमणूक केली आहे. त्वरित लेखापरीक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.

Bidri Sugar Factory Election
Bidri Sugar Factory : बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत सतेज पाटलांची उडी, आबिटकरांना धक्का बसण्याची शक्यता

चाचणी लेखापरीक्षणाची मागणी मारुतीराव जाधव गुरूजी, माजी संचालक नंदकिशोर सूर्यवंशी, दत्तात्रय उगले, गोकुळ संचालक नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, सूर्याजीराव देसाई, बाबा नांदेकर, अशोकराव फराकटे, विजय बलुगडे, शामराव भावके, विश्वनाथ पाटील, अशोकराव भांदीगरे, बाळासाहेब भोपळे यांनी केली होती.

बिद्रीच्या निवडणुकीत ८६२ अर्ज दाखल

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज अखेरच्या दिवशी १२५ उमेदवारांनी ७२ दुबार अर्जासह १९७ अर्ज भरले. आजअखेर ६६७ उमेदवारांनी १९५ दुबार अर्जांसह एकूण ८६२ अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल केले आहेत. महिला गटात सर्वाधिक २३५ अर्ज आले अर्ज भटक्या विमुक्त जाती गटातून दाखल झाले. गुरुवारी (ता. २) अर्जांची छाननी होणार असून शुक्रवारी (ता. ३) वैध अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com