Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input : बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीवेळी काळजी घ्या

Seed Fertilizer : कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक नुकसान टाळता येईल.

Team Agrowon

Buldana News : शेतीतून अधिकाधिक उत्पादनासाठी निविष्ठांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी निकृष्ट, भेसळयुक्त अथवा अनधिकृत उत्पादनांपासून बचाव करण्यासाठी बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

ते म्हणाले, की बियाणे, खते व कीटकनाशके फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. दर्जा व गुणवत्ता हमीसाठी सरकारने मान्यता दिलेल्या विक्रेत्यांकडूनच निविष्ठा खरेदी कराव्यात, खरेदीची पावती घेणे आवश्यक असून विना पावती खरेदी केल्यास तक्रार करण्याचा हक्क नाकारला जाऊ शकतो म्हणून बियाण्याचे पाकीट सिलबंद, लेबलयुक्त व मोहरबंद असावे.

पिशवी, टॅग आणि पावती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना वापरण्याच्या अंतिम मुदतीची खात्री करावी. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री अथवा कमी वजन दिल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.

शंका आल्यास तक्रार नोंदवावी. तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी.

कृषी विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक नुकसान टाळता येईल. शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले.

एचटीबीटीपासून सावधान

एचटीबीटी /बीटी-३ अशा प्रकारच्या चोर बियाण्यांपासून दूर राहावे. अनधिकृत बीटी बियाणे खरेदी करू नये. शिफारस केलेल्या तणनाशकांचा वापर मान्यता प्राप्त बियाण्यांसाठीच करण्याची शिफारस केली असल्यास तणनाशकांचा वापर करावा.

भेसळ, बनावट उत्पादने असल्यास तसेच याबाबत अनधिकृत विक्रीबाबत माहिती मिळाल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागास तत्काळ कळवावे, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Market: खानदेशातील पशुधन बाजारांत गजबज

Akola Heatwave: अकोल्यात उन्हाचा पारा वाढल्याने घामाच्या धारा

Water Shortage: फुलवडे येथील पाझर तलावाने गाठला तळ

Banana Farming Crisis: पार्डी शिवारात केळीची तीन हजार झाडे कापली

Women Farmer Story: महिला पशुपालकांनी शोधलाय इंधन स्वयंपूर्णतेचा मार्ग

SCROLL FOR NEXT