Fake Fertilizers: न्हावरे येथे बनावट खत निर्मितीचा पर्दाफाश

Agriculture Department Raid: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे बनावट रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे कृषी विभागाने छापा टाकत पर्दाफाश केला आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे बनावट रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पुणे कृषी विभागाने छापा टाकत पर्दाफाश केला आहे. विनापरवाना अमोनिअम सल्फेट आणि मॅग्नेशिअम सल्फेट या खतांचे बेकायदेशीर उत्पादन आणि साठा करत असताना दोघांना रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत सुमारे ८ लाख ७८ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुणे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय दिनकर पाटील यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणी संतोष दिनकर वेताळ आणि महेंद्र गणपत शेलार, (दोघेही रा. न्हावरा, ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास, न्हावरा ते गुनाट रोडवरील गट नंबर ३१३ मध्ये काही व्यक्ती बेकायदेशीरपणे रासायनिक खतांची

Fertilizer
Urea Shortage: खानदेशात युरियाची टंचाई! शेतकरी हवालदिल

निर्मिती करत असल्याची गोपनीय माहिती पुणे कृषी विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धनंजय पाटील, शिरूर पंचायत समिती खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी दिनेश अडसूळ, कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ, तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) डॉ. प्रवीण कदम या पथकाने तातडीने त्याठिकाणी छापा टाकला.

Fertilizer
Urea Shortage: खानदेशात युरियाची टंचाई! शेतकरी हवालदिल

तिथे अमोनिअम सल्फेट आणि मॅग्नेशिअम सल्फेट या खतांच्या उत्पादनाचा किंवा साठवणुकीचा कोणताही कायदेशीर परवाना नसताना फसवणूक करून बनावट खत निर्मिती करताना पकडण्यात आले आहे.परवान्यामध्ये मंजूर नसलेल्या व इतर अन्य कंपनीचे खताचे उत्पादन करून पिशव्यांमध्ये भरत असल्याचे दिसून आले.

घटनास्थळावरून अमोनिअम सल्फेटच्या ९१७ बॅग, तसेच मॅग्नेशिअम सल्फेटच्या ११ बॅगा असा एकूण ८ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com