Spinach Benefits  Agrowon
ॲग्रो विशेष

Healthy Spinach : आरोग्यदायी पालकाचे फायदे

Spinach Benefits : पालकातील लोह आणि मॅग्नेशिअम शरीराला ऊर्जा देते. पालकातील जीवनसत्त्व अ आणि क चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत होते.

Team Agrowon

साक्षी जिवतोडे, डॉ. विजया पवार

पालकातील लोह आणि मॅग्नेशिअम शरीराला ऊर्जा देते. पालकातील जीवनसत्त्व अ आणि क चयापचय सुधारते, ज्यामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत होते. पालकातील कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व क हाडांची मजबुती वाढवते.

हिवाळा हंगाम आहारासाठी उत्तम

मानला जातो. या हंगामात भरपूर ताज्या हिरव्या पालेभाज्या मिळतात, ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पालकामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात आणि शरीराला यातून ताकद मिळते. थंड हवामान उत्पादित पालक अधिक चवदार, ताजा आणि पोषणमुल्यांनी समृद्ध असतो. हिवाळी हंगामात शरीराला गरम ठेवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि पोषण मिळवण्यासाठी पालकाचा आहारात समावेश करावा.

पालकाचे फायदे

हिवाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा लागते. पालकात लोह आणि मॅग्नेशिअम शरीराला ऊर्जा देतात. थंडीत सक्रिय ठेवतात. पालकातील जीवनसत्त्व अ आणि क चयापचय सुधारतात, ज्यामुळे शरीराला गरम ठेवण्यास मदत होते.

थंड हवामानात सर्दी, खोकला आणि फ्लूसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. पालकातील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून अशा आजारांपासून संरक्षण करतात.पालकातील फॉलिक अॅसिड नवीन रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराची ताकद वाढते.

हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निस्तेज होते. पालकातील जीवनसत्त्व अ आणि क त्वचेला चांगले ठेवते. पालकात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे वृद्धत्व टाळतात,त्वचा चमकदार बनवतात.

हिवाळ्यात शरीराला कॅल्शिअमची अधिक गरज असते. पालकातील कॅल्शिअम आणि जीवनसत्त्व क हाडांची मजबुती वाढवते. ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतात.

थंड हवामानामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते. पालकातील लुटीन आणि झॅंथिन हे अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांची दृष्टी सुधारतात. थंडीत डोळ्यांचे आरोग्य टिकवून ठेवतात.

पालकामध्ये जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते, याच्या सेवनाने डोळ्यांशी संबंधित समस्याही दूर होतात.

हिवाळ्यात पचनसंस्था मंदावते. पालकातील तंतूमय घटकामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते.

हिवाळ्यात रक्तदाब अनियमित होण्याची शक्यता असते. पालकातील पोटॅशिअम आणि नायट्रेट्स रक्तदाब संतुलित ठेवतात, हृदयविकाराचा धोका कमी करतात.

हिवाळ्यात वजन वाढण्याची समस्या सामान्य आहे. पालक कमी कॅलरीयुक्त असूनही तंतुमय घटकांनी समृद्ध आहे, ज्यामुळे पचन सुधारते आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.

थंडीच्या मोसमात बद्धकोष्ठता ही समस्या असू शकते. हिवाळ्यात पालकाचे सेवन केल्यास त्यात असलेले तंतुमय घटक बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करतात. याशिवाय याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.

शरीरात रक्ताची कमतरता असताना पालकाचा आहारात समावेश केल्यास फायदा होतो. कारण यामध्ये असलेले लोह शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत करते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.

- साक्षी जिवतोडे, ९४२०६२६५३३, डॉ. विजया पवार, ९३५६०७३९६५,

(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fish Transport Technology: जिवंत माशांच्या वाहतुकीसाठी स्मार्ट कॅरी बॅग

Dam Storage: अकोला, बुलडाण्यातील प्रकल्प तुडुंब

Khandesh Heavy Rain: खानदेशात २५ हजार हेक्टरवरील पिकांची वाताहत

Water Conservation: लोकसहभागातून जलसमृद्ध गावाची लोक चळवळ व्हावी

Solapur Heavy Rain: सोलापुरात आठ मंडलांत अतिवृष्टी,सोयाबीनसह तूर, उडदाचे नुकसान

SCROLL FOR NEXT