sandeep Shirguppe
पालक खाण्याचे अनेक फायदे तर आपल्याला माहीती आहेत. पण लाल पालक खाण्याचे फायदे काय आहेत हे पाहुयात.
हिरव्या पालकाव्यतिरिक्त तुम्ही लाल पालकही खाऊ शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
लाल पालकात व्हिटॅमिन सी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात.
लाल पालकामध्ये भरपूर फायबर असते. तसेच पचनक्रिया सुधारते. हे कोलन कॅन्सर, कोलेस्टेरॉलवरही गुणकारी आहे.
लाल पालक बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देतो. ते पचनसंस्था मजबूत करते.
लाल पालक प्रथिनांनी समृद्ध आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
लाल पालक अॅनिमियाच्या उपचारांसाठी भरपूर प्रमाणात लोह आहे. तुम्ही ते रोज खाऊ शकता. याने रक्त शुद्ध होते.