Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा भरपाईपोटी २७.७३ कोटींचा लाभ

Crop Damage : सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने पीकविम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Satara News : २०२३ च्या खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा रकमेची भरपाई देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील २७.७३ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

सर्वसमावेशक पीक योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईपोटी राज्य शासनाने पीकविम्याची रक्कम ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला वर्ग करण्यासाठी मान्यता दिली आहे.

त्यामुळे सातारा, नाशिक, जळगावसह सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी १९२७ कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत. पीकविमा योजना बीड पॅटर्नवर आधारित राबविण्यात येते. म्हणजेच ज्या ठिकाणी पीकविमा हप्त्याच्या ११० टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे,

त्या ठिकाणी ११० टक्केपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप हंगाम २०२३ मधील मंजूर सात हजार ६२१ कोटी रुपयांपैकी विमा कंपनीमार्फत पाच हजार ४६९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आले आहेत,

तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी १९२७ कोटी रुपयांच्‍या नुकसान भरपाईचे वाटप प्रलंबित होते. ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २७.७३ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT