Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सलग पाचव्या वर्षी ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

Team Agrowon

Chh. Sambhajinagar / Parbhani News : ऑगस्ट मध्ये परभणी जिल्ह्यात सरासरी २२७.८ मिलिमीटर अपेक्षित असताना या वर्षी (२०२४) प्रत्यक्षात सरासरी १५३.९ मिलिमीटर (६७.६ टक्के), तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २४१.२ मिलिमीटर अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५०.४ मिलिमीटर (६२.४ टक्के) पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यात ७३.९ मिलिमीटर, तर हिंगोली जिल्ह्यात ९०.८ मिलिमीटर पावसाची तूट आली आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये सलग पाचव्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

परभणी जिल्ह्यात ४३ मंडलांत कमी पाऊस...

यंदा ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील ५२ पैकी ९ मंडलांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस त्यात बामणी २४३.३ मिमी (१०८.९ टक्के), रामपुरी २५३.५ मिमी (१०४.१ टक्के), आवलगाव २४४.१ मिमी (११९.२ टक्के), शेळगाव २२०.३ मिमी (१०७.६ टक्के), वडगाव २३३.२ मिमी (११३.९ टक्के), महातपुरी २५९.५ मिमी (१२६.३ टक्के), माखणी २०६.१ मिमी (१००.३ टक्के), पेठशिवणी २१०.२ मिमी (१०३ टक्के),

रावराजूर २१९.७ मिमी (१०७.६ टक्के) या मंडलांचा समावेश आहे. उर्वरित ४३ मंडलात सरासरीच्या तुलनेत २८ टक्के (कोल्हा मंडल ६८.१ मिमी) ते ९३.८ टक्के (सोनपेठ मंडल १९२.१ मिमी) पाऊस झाला. जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी ५९२.३ मिलिमीटर अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात ५५९.५ (९४.५ टक्के) पाऊस झाला. गतवर्षी ३३८.८ मिमी (५७.२ टक्के) पाऊस झाला होता.

हिंगोली जिल्ह्यात २८ मंडलांत पावसाची तूट

यंदा ऑगस्ट महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २ मंडलांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यात पानकन्हेरगाव मंडलात २३८ (१११.७ टक्के), हत्ता मंडलात २२५.७ (१०५.९ टक्के) पाऊस झाला. उर्वरित २८ मंडलात सरासरीच्या तुलनेत २८.१ टक्के (सिरसम मंडल ७५ मिमी) ते ८४.६ टक्के (आंबा मंडल १८३.७ मिमी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT