Maharashtra Rain : राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

Rain Forecast : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहे.
Maharashtra Rain
Maharashtra Rain Agrowon
Published on
Updated on

Pune News : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहे. तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडत आहे. घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शनिवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना (नवजा) घाटमाथ्यावर १०३ मिलिमीटर पाऊस झाला असून, ओढे-नाल्यातील व नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे.

कोकणातील ठाणे जिल्ह्यातील नयाहडी येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. रायगडमधील पवयंजे, मोराबी येथे ३४ मिलिमीटर, तर बिरवडी ३८ मिलिमीटर, रत्नागिरीतील कळकवणे येथे ६० मिलिमीटर, तर सावर्डे ४७, शिरगाव ५१, शिर्शी ५०, कुळवंडी ७२, भरणे ५४, दाभीळ ५०, सौंदळ ३१ मिलिमीटर पाऊस झाला.

Maharashtra Rain
Maharashtra Rain Alert : विदर्भात पाऊस वाढण्याचा अंदाज; मराठवाड्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज

सिंधुदुर्गमधील वैभववाडी, येडगाव, भुईबावडा, तळकट, भेडशी येथे हलका पाऊस पडला. पालघरमधील डहाणू, मालयण, कसा येथे ४५ मिलिमीटर, तर वाडा, कोणे ३०, मोखडा ३१, खोडला ३६, तलवड ४५ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचा जोर कमी झाला असला तरी नद्या अजूनही भरून वाहत आहे. खानदेशात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मात्र नंदूरबारमधील नवापूर येथे ३६ मिलिमीटर पाऊस पडला असून धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते.

तुरळक ठिकाणी शिडकावा झाला. मध्य महाराष्ट्रात पाऊस नसला तरी अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. नाशिकमधील बाऱ्हे, मनखेड येथे ४२ मिलिमीटर, तर उंबरठाणा ३९, धारगाव ३२, कोहोर, करंजाळी ३८, दहादेवाडी ३१ मिलिमीटर पाऊस झाला. पुण्यातील वेल्हा येथे ४० मिलिमीटर, कार्ला येथे २९ मिलिमीटर पाऊस झाला असून साताऱ्यातील महाबळेश्वर येथे तुरळक सरी कोसळल्या. तर सोलापूर, कोल्हापूर, नगर, सातारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह अधूनमधून ऊन पडत होते. त्यामुळे पिके वाफसा अवस्थेत येत आहेत. घाटमाथ्यावरही पावसाच्या हलका सरी पडल्या.

Maharashtra Rain
Maharashtra Rain : घाटमाथा, कोकणात पावसाच्या मध्यम सरी

मराठवाड्यातील जालन्यातील नेर येथे ४७ मिलिमीटर, तर शेवळी ३८, तलाणी २१, ढोकसळ २६, पांगरी ३४ मिलिमीटर पाऊस झाला. तर बीडमधील नागापूर ३२ मिलिमीटर, नांदेडमधील आष्टी येथे ४१, तर तामसा येथे ४० मिलिमीटर, तर बिलोली, सगरोळी, कुंडलवाडी, लोहगाव, रामतीर्थ, मालेगाव येथे तुरळक सरी बरसल्या. हिंगोलीतील हत्ता येथे ४२ मिलिमीटर, तर वाकोडी, आखाडा, येहळेगाव, साळणा, जवळा बाजार, सेनगाव, गोरेगाव येथे पाऊस झाला.

विदर्भातील बुलडाण्यातील नांदुरा येथे ४० मिलिमीटर, तर सोनाशी ३८, जळगाव, जामोद ३१ मिलिमीटर, वाशीममधील मालेगाव येथे ३५ मिलिमीटर, तर शिरपूर, मुंगळा, मेडशी, करंजी, जऊळका येथे तुरळक सरी पडल्या. अमरावतीतील सिंगड येथे २७ मिलिमीटर, तर सेमडोह, टेंभूरसोंडा येथे हलका पाऊस पडला. गडचिरोलीतील सिरोंचा येथे ३८ मिलिमीटर, तर बामणी ३६, काढोली ३३, माळेवाडा ३४, धानोरा ३१ मिलिमीटर पाऊस झाला असून उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह अधूनमधून हलका पाऊस बरसत होता. त्यामुळे शेतातील पाणी कमी झाल्याने नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे.

सोलापूर, कोल्हापूर, नगर, सातारा जिल्ह्यांत ढगाळ वातावरण.

खानदेशात पावसाची उघडीप.

धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत ढगाळ वातावरण.

विदर्भ, वऱ्हाडात काही ठिकाणी हलक्या सरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com