Nandani Math Elephant Agrowon
ॲग्रो विशेष

Nandani Math Elephant: नांदणी मठाची ‘महादेवी’ दुरावली

Elephant Relocation: अवघी चार वर्षांची असताना ती नांदणीच्या मठात दाखल झाली, आपल्या निरागस वावरामुळे मठातील सर्वांना तिचा आपसूकच लळा लागला. हळूहळू नांदणीकरांच्या प्रत्येक घराची जणू ती सदस्यच बनली.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: अवघी चार वर्षांची असताना ती नांदणीच्या मठात दाखल झाली, आपल्या निरागस वावरामुळे मठातील सर्वांना तिचा आपसूकच लळा लागला. हळूहळू नांदणीकरांच्या प्रत्येक घराची जणू ती सदस्यच बनली. सर्व काही व्यवस्थित सुरू असताना अचानक कुठून तरी तिला तब्येतीचे कारण देत गुजरातला नेण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नांदणीकरांमध्ये अस्वस्थता पसरली. सोमवारी (ता. २९) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र महादेवीचा हा ३२ वर्षांचा सहवास संपुष्टात आला. 

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थानाला सुमारे १२०० वर्षांचा इतिहास आहे आणि महाराष्ट्र-कर्नाटकातील जैन समाजाच्या सुमारे ७४८ गावांचे ते श्रद्धास्थान आहे. अनेक दशकांपासून या मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे. महादेवी या हत्तीणीचे वय ३६ वर्षे आहे.

ती ४ वर्षांची असताना, म्हणजेच १९९२ मध्ये तिला नांदणी मठात आणले गेले. आल्यापासूनच ती पंचक्रोशीची लाडकी बनली. कुटुंबातील सदस्य बनली. मठाच्या अनेक धार्मिक विधींमध्ये तिचा महत्त्वाचा सहभाग असे, विशेषतः पंचकल्याण पूजा आणि मिरवणुकांमध्ये तिला इंद्र-इंद्राणींना घेऊन जाण्याचा मान होता. 

पेटाच्या एका अहवालाने तिच्या मठात राहण्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. प्राणी हक्कासाठी काम करणाऱ्या पेटा इंडिया या संस्थेने महादेवीच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. महादेवीला गुजरातमधील अंबानी कुटुंबीयांच्या मालकीच्या वनतारा संस्थेत पुनर्वसन करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

हत्तिणीचा ताब्यावरून न्यायालयीन लढाया झाल्या. अखेर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचिका फेटाळली. हे वृत्त समजताच मठात सगळे गाव जमले. महादेवीची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मठाधिपती स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या भावनेचा बांध फुटून तेही रडू लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chhattisgarh Urea Supply: छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दिलासा; केंद्राने ६० हजार मेट्रिक टन यूरिया मंजूर केला

GST Reforms India : दुग्धजन्य पदार्थांवरील GST कमी केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा, जाणून घ्या कसा फायदा होणार?

Semiconductor Chip : आली पहिली 'मेड इन इंडिया' चिप! शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Marathwada Flood: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; पंचनाम्यांना विलंब

Genome Paddy Variety : भारताने विकसित केलेल्या जगातील पहिल्या जिनोम संपादित भात वाणाची काय आहे खासियत?

SCROLL FOR NEXT