Pusesavali News: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर करून ऊस पिकामध्ये ६० ते ७० टक्के पाण्याची बचत करणे शक्य आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे खतांचा खर्च कमी होऊन मजुरांवरील अवलंबित्वही घटणार आहे. कमी पाण्यात आणि योग्य व्यवस्थापनातून उसाचे एकरी १०० टन उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन माजी सहकारमंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केले..चोराडे (ता. खटाव) येथे सह्याद्री साखर कारखाना, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) बारामती यांच्या सहयोगाने उभारलेल्या ‘एआय’ ऊस शेती प्रकल्पाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ‘व्हीएसआय’चे शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, केव्हीके बारामतीचे आकाश वळकुंडे, नितीन शिंदे, अरुण पडवळ, ऊस विकास अधिकारी संजय चव्हाण, संतोष घार्गे, लालासो पाटील, सुहास पिसाळ, कृष्णत पिसाळ, सुरेश पाटील, तुषार माने, उदय गुरव, योगेश शिंदे, अविनाश घार्गे आणि अरविंद शिंदे उपस्थित होते..Ai in Dairy Farming: कृत्रिम बुद्धिमत्तेतून दुग्ध व्यवसायात परिवर्तन.बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे वाऱ्याचा वेग, दिशा, तापमान, आर्द्रता आणि पुढील १४ दिवसांतील हवामान बदलाची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळेल. यामुळे पाणी व खत व्यवस्थापन अचूक करता येईल. रोग-किडींच्या निर्मूलनासाठी वेळीच उपाययोजना करणे शक्य झाल्याने उत्पादन खर्चात ४० टक्के बचत आणि उत्पादनात ३५ ते ४० टक्के वाढ होईल..AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?.खासदार शरद पवार यांचा शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आग्रह होता, त्यास अनुसरून तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी अनुदान योजना निश्चित केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडूनही या योजनेस अर्थसाहाय्य मिळत असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा..या प्रसंगी विजय पवार, संजय घार्गे, अशोक कदम, कमलाकर घार्गे, विजय जाधव, प्रकाश शिंदे, बाबुराव पिसाळ, दत्तात्रय साळुंखे, शामराव पिसाळ, नामदेव पिसाळ, शंकर जानकर, प्रकाश लोकरे, सुभाष पिसाळ, विलास पिसाळ, दत्तात्रय घोडके, वसंत पिसाळ, दिनकर पाटील, संतोष माळी, सुधाकर कुंभार, लक्ष्मण पिसाळ, अंबादास पिसाळ, निवास पिसाळ, सुरेश पिसाळ, मारुती पिसाळ, महेश पिसाळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.