Ujani Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam : मे महिन्यात उजनी गाठणार तळ

कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सोडलेले उजनी धरणातील पाणी १५ मेपर्यंत सुरुच राहणार आहे.

Team Agrowon

Solapur News : कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सोडलेले उजनी धरणातील पाणी १५ मेपर्यंत सुरुच राहणार आहे. कॅनॉल (Canaal), बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून (Irrigation Scheme) शेतीसाठी पाणी सोडले आहे.

आता सीना नदी (Seena River) काठावरील लाइट बंद करण्यात आली असून नदीतूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी तळ गाठणार आहे.

सोलापूर शहरासाठी नुकतेच भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले होते. औज बंधाऱ्यात ते पाणी पोचल्याने भीमा नदीत सोडलेले पाणी आता बंद करण्याात आले आहे. सीना नदीतून आता शेती व जनावरांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.

त्यातून वडकबाळ, सिंदखेड, कोर्सेगाव व बंदलगी, हे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. तत्पूर्वी, २० बंधारे भरून घेण्यात आले आहेत. कॅनॉलद्वारे ‘टेल टू एण्ड’पर्यंत पाणी सोडले जात आहे. आता नंदुरपर्यंत पाणी पोचले आहे.

दरम्यान, सोलापूर शहरासाठी मे महिन्यात भीमा नदीतून आणखी एक रोटेशन सोडले जाणार आहे. त्यावेळी सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे १० ते १५ मेपर्यंत कॅनॉल व बोगद्यातूनही पाणी सुरु राहणार आहे.

कॅनॉलमधून एक रोटेशन सोडण्यासाठी किमान सात टीएमसी पाणी लागते. या सर्व बाबींचा विचार करता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरण मायनसमध्ये जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

आंदोलन नको; चार बंधारे भरले जातील

सीना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

त्यामुळे सीना नदी आणि कुरुल कॅनॉलमध्ये टेल टू एण्डपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्याकडे केली आहे.

ठळक बाबी...

धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८० टीएमसी आहे.

उजनीत जिवंत साठा १५.६३ टीएमसीपर्यंत आहे.

सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचनमधून ४३३ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

बोगद्यातून ८८० क्युसेक तर कॅनॉलमधून तीन हजार क्युसेकने पाणी सुरु आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement : सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर कापूस ओलाव्याची मर्यादा २० टक्क्यांपर्यंत वाढवा; तेलंगणा सरकारचे केंद्र सरकारला पत्र

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी वेळेचे नियोजन

Rabi Season: रब्बी हंगामात संवर्धित शेती पद्धती फायद्याची

Bogus Onion Seed: बोगस कांदा बियाण्यांचा फटका; शेतकऱ्यांची पोलिसांत धाव

Indian Politics: मौनं सर्वार्थ साधनम् !

SCROLL FOR NEXT