River pollution In Sangli : नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई

गेल्या अनेक वर्षांपासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लांटचे काम सुरू आहे. हा प्लांट तत्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांभीर्याने सोडविणे आवश्यक आहे.
River Pollution
River PollutionAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील नद्यांमध्ये सांडपाणी मिसळून प्रदूषणाला जबाबदार असणारे कारखाने, कंपन्या, यंत्रणा यांची कोणत्याही स्थितीत गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी भूमिका पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी दोषींवर कडक कारवाई करा, असे आदेश दिले. कृष्णा नदीत १० मार्चला मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले होते. या घटनेला जबाबदार असणाऱ्या घटकांचा व त्यावरील केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री खाडे यांनी मंगळवारी (ता. २८) बैठक घेतली. प्र

दूषण नियंत्रण मंडळ, प्रशासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे यांनी परिस्थितीची माहिती दिली.

River Pollution
Krishna River Pollution : एकच मिशन, थांबवा कृष्णा प्रदूषण

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, की महापालिकेच्या पंपहाऊसमधील पंप वारंवार बंद पडत असल्याने प्रदूषित पाणी थेट नदीत सोडले जाते. परिणामी गेल्या काही दिवसांमध्ये नदीतील मासे मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले.

ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, नागरिकांच्या आरोग्यालाही यातून मोठ्या प्रमाणावर धोका संभवू शकतो. त्यामुळे या प्रदूषणाला जबाबदार असणाऱ्या यंत्रणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कठोर कारवाई करण्यात यावी.

यावेळी ते म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून शेरीनाल्यावरील एसटीपी प्लांटचे काम सुरू आहे. हा प्लांट तत्काळ पूर्ण करून सांडपाणी नदीत मिसळण्याचा प्रश्न गांभीर्याने सोडविणे आवश्यक आहे. प्रदूषित पाणी नदीत मिसळू नये, यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना त्वरित करा.

२०२२-२३ आणि २०२३-२४ मध्ये प्रदूषण टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल महानगरपालिकेकडील यंत्रणांनी तत्काळ सादर करावा.

महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. नदी प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या घटकांना प्रदूषण नियंत्रण मंडळासह जिल्हा प्रशासनाने नोटिसा बजावाव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com