Reshim Agrowon
ॲग्रो विशेष

Reshim Market News : ‘ई-नाम’ राबविणारे देशातले पहिले बारामतीचे रेशीम मार्केट

Reshim Udyog : बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणालीद्वारे १०० टक्के ऑनलाइन काम करणारे देशातील पहिले मार्केट आहे. ‘ई-नाम’मध्ये कोष कमोडिटीचा समावेश करण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘बारामती रेशीम कोष मार्केट हे ई-नाम प्रणालीद्वारे १०० टक्के ऑनलाइन काम करणारे देशातील पहिले मार्केट आहे. ‘ई-नाम’मध्ये कोष कमोडिटीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये देशातील खरेदीदार सहभागी होत आहेत. त्यामुळे रेशीम कोषास चांगला दर मिळत आहे,’’ असे मत पणन मंडळाचे सहाय्यक व्यवस्थापक महेंद्र लोखंडे यांनी व्यक्त केले.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ व रेशीम कार्यालयातर्फे सुरू केलेल्या रेशीम कोष मार्केटमध्ये ‘ई-नाम’ पद्धतीने कोष लिलावाच्या वर्षपूर्तीनिमित्त रेशीम शेतकरी व रिलर्स मेळावा नुकताच घेण्यात आला.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समितीचे सभापती सुनील पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक डॉ. कविता देशपांडे, पणन मंडळाचे एजीएम महेंद्र लोखंडे, रेशीम तांत्रिक सेवा केंद्राचे शास्त्रज्ञ शिवकुमार हुक्केरी, शास्त्रज्ञ हुमायून शरीफ, बाजार समितीचे उपसभापती नीलेश लडकत, सदस्य बापूराव कोकरे, विनायक गावडे, सतीश जगताप, दयाराम महाडीक, सांगलीचे जिल्हा रेशीम अधिकारी बापूराव कुलकर्णी, मुरलीधर कुट्टे, समितीचे सचिव अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘बारामती रेशीम कोष मार्केटमध्ये चांगली विक्री व्यवस्था आहे. अन्य राज्यांतील बाजारांप्रमाणे दर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या समितीतर्फे शेतकरी व रिलर्स यांना परवाना देण्यात येईल.

त्यामुळे सर्व रिलर्सनी परवाने घेऊन ई-नाम प्रणालीत नोंदणी करवा. ई-नाम पद्धती असल्याने देशातील रिलर्स व खरेदीदार यामध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे रिलर्सना एकाच ठिकाणी कोष मिळतील.

शेतकऱ्यांना ही जादा रिलर्स सहभागी झाल्यास स्पर्धा होऊन कोषास चांगला दर मिळेल. त्याचा शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होऊन त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल. शेतकऱ्यांनी आपले कोष ग्रेडिंग करून आणावेत. त्यामुळे प्रतवारीनुसार कोषास योग्य दर मिळेल.’’

‘खासगी व्यापाऱ्यांना कोष विकू नका’

शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना रेशीम कोष विक्री करू नयेत. त्यामध्ये फसवणूक होऊ शकते. तसेच भविष्यातील धोके विचारात घेऊन रेशीम कोष उत्पादकांनी कोष बारामती मार्केटमध्येच विक्रीस आणावा. खरेदीदार व रिलर्सनी परस्पर व थेट कोष खरेदी करू नयेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT