Team Agrowon
भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतं. त्यातीलच एक योदना म्हणजे ई-नाम पोर्टल योजना.
e-National Agriculture Market
अनेक योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे ई-नाम योजना. अर्थात e-National Agriculture Market होय.
केंद्र सरकार शेतकऱ्यांना आपलं पिक विकण्यासाठी ई-नाम नावाचे डिजीटल मार्केट उपलब्ध करुन दिले आहे.
हे एक पूर्ण: डिजीटल मार्केट आहे .यामुळे शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार एक मंच वर आला.
यामुळे शेतकरी आणि खरेदीदार यांच्यात कोणताही मध्यस्थ किंवा दलाल येऊ शकत नाही, शेतकरी आपला माल थेट विकू शकतात.
या पोर्टलद्वारे शेतकरी आपली पिके ऑनलाइन विकू शकतात, त्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही.
राष्ट्रीय स्तरावरील व्यापारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो.ई-नाम पोर्टल किमती आणि उपलब्धता देखील स्थिर करते.