Paddy Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

पंजाबमध्ये 'पाणी'दार वाणांच्या वापरावर बंदी

पंजाब सरकारने भरपूर पाणी लागणाऱ्या पुसा-४४ आणि पिली पुसा या भातपिकाच्या वाणांच्या लागवडीवर बंदी घातली आहे. भातपिकांच्या या वाणांमुळे मध्य विभागातील पाण्याची पातळी खचली असून जमिनींचा पोतही बिघडत असल्याचे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.

Team Agrowon

खरीप हंगामात भरपूर पाणी लागणाऱ्या भातपिकाच्या वाणांच्या लागवडीवर बंदी आणण्याची शिफारस पंजाब कृषी विद्यापीठाने (Punjab Agricultural University) राज्य सरकारकडे केली आहे. भातपिकांच्या या वाणांमुळे मध्य विभागातील पाण्याची पातळी खचली असून जमिनींचा पोतही बिघडत असल्याचे कृषी विद्यापीठाचे म्हणणे आहे.

संगरूर, लुधियाना, मोगा,मानसा, भटिंडा,बर्नाला, पटियाला जिल्ह्यांतील भूजल पातळी खालावली असल्याचे आमच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हे सर्व जिल्हे या भातपीक लागवडीसाठी ओळखले जातात. या विभागातील शेतकरी पुसा-४४ (PUSA-44) आणि पिली पुसा (Peeli PUSA) या भातपिकाच्या वाणांचा वापर करतात.

या दोन्ही वाणांना प्रचंड प्रमाणात पाणी लागते, तुलनेने ही दोन्ही पिके उशिराने येतात. त्यामुळे खरिपात या दोन्ही वाणांची लागवड करू नये, असा आग्रह आम्ही राज्य सरकारकडे धरला असल्याचे पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ.एस. एस. दत्त यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात कृषी विद्यापीठाने एक पत्रकारपरिषद आयोजित केली. यावेळी डॉ दत्त यांनी ही माहिती दिली आहे. इतर वाणांच्या तुलनेत पुसा-४४, पिली पुसा या वाणांना प्रचंड पाणी लागते. त्यांचे पीकही उशिराने हाती येत असते. त्यामुळे त्यांच्या लागवडीस मनाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यासंदर्भात गेल्या आठवड्यात ( दिनांक १७ एप्रिल) मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्याच्या कृषी विभागासह पंजाब कृषी विद्यापिठातील संशोधक उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक वाणांचा वापर करावा. पाण्याची, विजेची बचत करणारी पिके घ्यावीत, असे आवाहन मान यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

शेतकऱ्यांनी आता अल्पकाळात उत्पादन देणाऱ्या पीआर-१२६ आणि पीआर-१२१ या वाणांची लागवड करावी. या वाणांना पाणी कमी लागते, पर्यायाने विजेची बचत होते. मध्य भागात सातत्याने भातपिकाची लागवड (Paddy Cultivation) करण्यात येते.

या जिल्ह्यांत जास्ती पाणी लागणारी वाणे वापरल्याने जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे या नव्या वाणांमुळे पिकांच्या अवशेषांची समस्याही काही प्रमाणात सुटणार आहे. कारण पुसा-४४ आणि पिली पुसा या वाणांमूळे मोठ्या प्रमाणात अवशेष शिल्लक राहत आल्याचेही डॉ.दत्त म्हणाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Devendra Fadnavis BJP Victory: भाकीत खरं ठरलं! भाजपचा नवा रेकॉर्ड, किती जागा जिंकल्या?; फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

Orange Crop Insurance: संत्रा उत्पादकांना १७ कोटींचा विमा परतावा

Livestock Competition: लिंबोटीचा लालकंधारी वळू ठरला चॅम्पियन

Agriculture Crisis: अनियमित विजेमुळे रब्बी पिके धोक्यात

Vijay Wadettiwar: 'चंद्रपूर में टायगर अभी जिंदा हैं'; काँग्रेसच्या ८ नगराध्यक्षांच्या विजयानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT