पंजाबमध्ये गहू खरेदी १७ लाख टनांवर !

रशिया-युक्रेन संघर्षामुळे भारताच्या गव्हाला मोठी मागणी आहे. देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्य असलेल्या पंजाबलाही याचा मोठा फायदा होत आहे. चालू रब्बी हंगामात आताच गहू खरेदीचा आकडा १७ लाख मेट्रिक टनांवर गेला आहे.
Wheat Procurement
Wheat Procurement Agrowon
Published on
Updated on

रशिया-युक्रेन संघर्षामुळे भारताच्या गव्हाला मोठी मागणी आहे. देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्य असलेल्या पंजाबलाही याचा मोठा फायदा होत आहे. चालू रब्बी हंगामात आताच गहू खरेदीचा आकडा १७ लाख मेट्रिक टनांवर गेला आहे. गेल्या १५ वर्षांतील ही विक्रमी गहू खरेदी ठरली आहे.

Wheat Procurement
यापुढे श्रीमंत शेतकऱ्यांना वीजदरात सवलत नाही ?

राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये गहू खरेदीला उधाण आले आहे. सरकारी खरेदी केंद्रावर आणि खुल्या बाजारातही गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. १३ एप्रिलपर्यंत १७ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गहू खरेदीनंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांत सरकारकडून ८२८ कोटी रुपयांची रक्कम यापूर्वीच जमा करण्यात आली आहे. आणखी ८७१ कोटी रुपयांची रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे.

हंगामाच्या प्रारंभीच गहू खरेदीला जोर आल्यामुळे यंदा शेवट्पर्यंत एकूण गहू खरेदीचा आकडा नवा विक्रम नोंदवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या रब्बीत सरकारकडून १२३ लाख मेट्रिक टन गहू खरेदीची व्यवस्था करण्यात आली आहे. गहू खरेदीत खाजगी व्यापारीही मागे नाहीत. राज्यात आतापर्यंत खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गव्हाची आकडेवारी १ लाख टनांवर गेली आहे. विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना गव्हासाठी किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) अधिक किंमत दिली जात आहे.

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपर्यंत (दिनांक १४ एप्रिल) खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या गव्हाची आकडेवारी १,३३,३७० मेट्रिक टनांवर गेला आहे. शुक्रवारी (दिनांक १५ एप्रिल) ३३७३३ मेट्रिक गहू खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) प्रति क्विंटल २०० ते २५० रुपयांनी जास्त दर हे व्यापारी शेतकऱ्यांना देत आहेत.

गेल्या हंगामात खाजगी व्यापाऱ्यांनी १.१७ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी केली होती. २०२० साली हे प्रमाण केवळ ५६ हजार मेट्रिक टनांवर होते. २०१४ साली खाजगी व्यापाऱ्यांनी २.९ लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला होता. यंदा संपूर्ण हंगामात खाजगी व्यापारी ५ लाख मेट्रिक टनांहून अधिक गहू खरेदी करतील, असा अंदाजही राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com