Bamboo Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : बुलडाणा जिल्ह्यात होणार २० हजार हेक्टरवर बांबू शेती

Bamboo Cultivation : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देण्याचा एक पर्याय म्हणून बांबू शेतीकडे बघितले जात आहे.

Team Agrowon

Buldana News : शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देण्याचा एक पर्याय म्हणून बांबू शेतीकडे बघितले जात आहे. जिल्हा प्रशासन व ईश्वेद बायोटेकच्या पुढाकाराने जिल्ह्यात २० हजार हेक्टरवर बांबू शेती उभी राहणार आहे. या नियोजनाच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वीच बैठकही झाली असून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

या वर्षात जिल्ह्यात २० हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे. बांबू शेतीसाठी शेतकऱ्यांना ७ लाख ४० हजार रुपये प्रती हेक्टरी अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात बांबू शेतीखालील क्षेत्र वाढवण्याच्या उद्देशाने झालेल्या बैठकीला उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, विभागीय वन अधिकारी विपुल राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील, ईश्वेद बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय वायाळ उपस्थित होते.

यावेळी डॉ. पाटील म्हणाले, पारंपरिक पिकांपासून दूर करून शेतकऱ्यांना तीन वर्षात बांबू शेतीपासून शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱ्यांनी बांबू शेतीसाठी पुढाकार घेतल्यास त्यांना शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पंचायत समिती, कृषी विभागाकडे अर्ज केल्यानंतर त्यांना बांबूची रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बाल्को ही जादा पाणी आणि ग्रीन वुल्गरीस बांबू ही कमी पाण्यावर जगणारी प्रजाती आहे.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबूची लागवड होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांचा गट करून त्यांच्यामार्फत बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. गावपातळीवर शेतकऱ्यांची निवड करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल. बांबू शेती करताना पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना आंतरपीकही घेता येणार आहे. बांबू शेतीसाठी चार वर्षात टप्प्याटप्प्याने ७ लाख ४० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल.

ईश्वेद बायोटेकमार्फत जिल्ह्यात टिश्यू कल्चर रोपांचा शेतकऱ्यांना पुरवठा केला जाईल. यात बांबूच्या बाल्कवा, टुल्डा, अॅजपर, ब्रॅडिंसी, ग्रीन व्हल्गारीस, मानगा, मानवेल अशा वेगवेगळ्या दहा जातींची हेक्टरी १,१११ रोपे देणार आहोत. चार वर्षांसाठी शेतकऱ्याला मनरेगातून सात लाख ४० हजार रुपये अनुदानही मिळेल. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या पंचायत समिती गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा वन विभागाकडे सातबारा, नमुना आठ अ, आधारकार्ड व जॉबकार्ड द्यावे.
-संजय वायाळ, व्यवस्थापकीय संचालक, ईश्वेद बायोटेक, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Surveys: पावसाची तूट असलेल्या भागांत तातडीने पाहणी करून पंचनामे करा; पिके वाचविण्यासाठी १२ तास वीज देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maratha Reservation Issue: मंत्री विखे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाचे वाटोळे

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन चिघळलं; धाराशिवमध्ये आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली, अनेक ठिकाणी रास्तो रोको

Sugarcane Crushing Season: ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने सुरू करणे शेतकऱ्यांना अडचणीचे

Biorefinery Technology: दुसऱ्या पिढीची बायोरिफायनरी

SCROLL FOR NEXT