Integrated Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Integrated Farming : एकात्मिक शेतीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आवश्यक

Agriculture Method : उत्पन्न वाढीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजानुरुप तंत्रज्ञानाचा प्रसार करावा लागेल. एकात्मिक शेती पध्दतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल.

Team Agrowon

Parbhani News : उत्पन्न वाढीसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजानुरुप तंत्रज्ञानाचा प्रसार करावा लागेल. एकात्मिक शेती पध्दतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल. शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक या संकल्पना रुजवावी लागेल असा सूर शुक्रवारी (ता. २१) परभणी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय सल्लागार आढावा बैठकीमध्ये शास्त्रज्ञ तसेच शेतकऱ्यांनी आळविला.

जीवन ज्योत चॅरीटेबल ट्रस्टचे सचिव रविराज देशमुख अध्यक्षस्थानी होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पी. आर. देशमुख, विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ. जी. डी. गडदे, पुणे येथील अटारीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सय्यद शाकिर अली, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, प्रगतिशील शेतकरी दिगंबर अंभुरे, जनार्धन आवरगंड, रामेश्वर साबळे, प्रकाश हरकळ उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा संक्षिप्त अहवाल तसेच २०२५ चा वार्षिक कृती आराखडा सादर केला. कृषी विज्ञान केंद्राचे विशेष उपक्रम, पीक प्रक्षेत्र चाचणी, आद्यरेषा पीक प्रात्यक्षिक, प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रमांचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला.

प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध प्रकल्पांच्या उत्पादनांची सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रक्रिया या घटकामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, कृषी विज्ञान केंद्र यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

डॉ. सय्यद शाकिर अली म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप तसेच हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. डॉ. गडदे म्हणाले, की कृषी विभाग, आत्मा व केव्हीके यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विभागाच्या योजना, एकात्मिक शेतीबाबत शेतकऱ्यांत जागृती तसेच इतर विस्तार विषयक विशेष मोहीम राबवावी लागेल.

डॉ. देशमुख म्हणाले, की शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करावे. केव्हीकेमार्फत वर्षभरातील कामाची परिणामकारकता तपासून त्याबाबतचा अहवाल विस्तार शिक्षण संचालाकांना सादर करावा. सूत्रसंचालन डॉ. अरुणा खरवडे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Drone: जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कृषी ड्रोन हाताळणीचा अनुभव

Safflower Sowing: करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

Soybean Market: सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयांचे चुकारे अदा

Sugarcane Farmer Issues: सीनाकाठच्या शेतकऱ्यांकडे कारखानदारांची पाठ

Manikrao Kokate: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत, २ वर्षांची कारावासाची शिक्षा कायम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT