Parbhani News: राज्य सहकारी पणन महासंघ (मार्केटींग फेडरेशन) अतंर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील १६ पैकी १० केंद्रांवर शनिवार (ता. १३) पर्यंत हमीभावाने सोयाबीन विक्री केलेल्या पैकी ९१२ शेतकऱ्यांना १४ हजार ४८४ क्विंटल .सोयाबीनचे ७ कोटी ७१ लाख ७० हजार रुपयावर चुकारे अदा करण्यात आले, आहेत अशी माहिती जिल्हा मार्केटिंगच अधिकारी कुंडलिक शेवाळे यांनी दिली..परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रांवर शनिवार (ता.१३) पर्यंत १० हजार ८७० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.त्यापैकी ३ हजार ३३४ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले असून १ हजार ११३ शेतकऱ्यांच्या १९ हजार ५४३ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली..या सोयाबीनची किंमत १० कोटी ४१ लाख २५ हजार १०४ रुपये होते. आजवर परभणी, जिंतूर, बोरी, सोनपेठ,पूर्णा या ५ केंद्रावर खरेदी केलेल्या पैकी ६ हजार २६४.५० क्विंटल सोयाबीनचे ३ कोटी ३३ लाख ७७ हजार २५६ रुपये चुकारे ४३७ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. .Soybean Market: अहिल्यानगरला सोयाबीनला साडेतीन ते चार हजारांचा दर.हिंगोली जिल्ह्यातील ७ केंद्रांवर शनिवार (ता. १३) पर्यंत १२ हजार ६५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी ५ हजार ३८१ शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात आले असून ३ हजार १८४ शेतकऱ्यांचे ५८ हजार ५ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले..Soybean Market: लातूरमध्ये सोयाबीनची आवक मंदावली .या सोयाबीनची किंमत ३० कोटी ९० लाख ५३ हजार ३०४ रुपये होते.आजवर कनेरगाव, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव या ५ केंद्रावर खरेदी केलेल्यापैकी ८ हजार २१९ क्विंटल .सोयाबीनचे ४ कोटी ३७ लाख ९३ हजार ४९६ रुपये चुकारे ४७५ शेतकऱ्यांना अदा करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.