National Banana Day  Agrowon
ॲग्रो विशेष

National Banana Day : टेंभुर्णीत केळीच्या पोषणमूल्याबाबत जागृती

Nutrition Value Awarness of Banana : सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, केळी विक्रेते व निर्यातदार यांच्या वतीने नुकताच टेंभुर्णीत राष्ट्रीय केळी दिन साजरा करण्यात आला.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, केळी विक्रेते व निर्यातदार यांच्या वतीने नुकताच टेंभुर्णीत राष्ट्रीय केळी दिन साजरा करण्यात आला. या वेळी केळी फळांमध्ये असलेली पोषणमूल्ये व केळीचे आहारातील महत्त्व याविषयी जागृती करून उपस्थितांना केळी वाटप करण्यात आली.

करमाळा चौकात हा कार्यक्रम झाला. केळी निर्यातदार किरण डोके, प्रगतशील केळी उत्पादक सोमनाथ हुलगे, एम. के. देशमुख, मधुकर देशमुख, संतोष कुटे, सुरेश पराडे, अतुल देशमुख, अक्षय देशमुख, दत्तात्रय क्षीरसागर, राजेंद्र कोळेकर, धनंजय महाडीक, जयदत्त क्षीरसागर, सुदर्शन पाटील, किरण लोकरे विशाल कांबळे या वेळी उपस्थित होते. या वेळी केळी निर्यातदार डोके यांनी केळीमध्ये असलेली पोषणमूल्ये व आहारातील महत्त्व याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

ते म्हणाले, की मोठ्या प्रमाणावर पोषणमूल्य असणारी सहज उपलब्ध होऊन गोरगरिबांना खाण्यासाठी परवडणारी केळी हे पूर्ण अन्न असून, वर्षभर ते उपलब्ध असल्याने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. दोन वर्षाच्या लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत जे फळ खाऊ शकतात, सहज विकत घेऊ शकतात, अशी ही केळी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकते. देशात सर्वांत जास्त निर्यात आपल्या सोलापूर जिल्ह्यातून होते

केळी संशोधन केंद्र करावे

सोलापूर जिल्ह्यात सध्या १५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर केळीचे क्षेत्र आहे. त्याशिवाय सहा ते आठ कोल्ड स्टोअरेज आहेत. करमाळा, माढा तालुक्यात केळीला असणारे पोषक वातावरण, साठवणूक क्षमता आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोईचे असे हे ठिकाण तयार झाले आहे. त्यामुळे इथे केळी संशोधन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे, त्याचा विचार व्हावा, असेही मत यावेळी मान्यवर पाहुण्यांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके

Sangli Vote Percentage : मतदानाचा टक्का वाढला; सांगलीत फायदा कोणाला?

Assembly Election Voting : अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभेला मतदानात वाढ

Leopard Terror : अजिंठा डोंगर परिसरात बिबट्यांची दहशत

SCROLL FOR NEXT