कृष्णा काळे, डॉ. डी. बी. शिंदे
Banana Flour Food Processing : कुकीज बनविण्यासाठी ४० ते ६० टक्के वनस्पती तूप आणि ५० ते ६० टक्के साखर लागते. केळीच्या पिठापासून कुकीज तयार करता येतात. यासाठी सर्व घटक कणीक तयार करण्यासाठी एकत्र केले जातात. तयार केलेले पीठ मिक्सरच्या माध्यमातून मिसळले जाते. त्यानंतर पीठ मोल्डिंग/कटिंगसाठी तयार केले जाते.
रोटरी मोल्डिंग प्रक्रिया फक्त कोरड्या आणि मिश्रण केलेल्या पिठासाठी वापरली जाते. पीठ बनवण्याच्या पद्धतीमध्ये, पीठ डायजच्या एका ओळीतून बाहेर काढले जाते. जे एका फ्रेमवर बसवलेल्या वायर किंवा ब्लेडने कापले जाते.
डाय नोजल आउटलेटच्या अगदी खाली पिठातून फिरते.बेकिंग ओव्हनमध्ये कुकीज इच्छित तापमानावर गरम केल्या जातात. बेकिंगनंतर या कुकीज पॅकेजिंगपूर्वी सामान्य तापमानाला थंड केल्या जातात. त्यानंतर पॅकिंग केले जाते.
केळी कुकीज बनवण्यासाठी साहित्य : केळीचे पीठ १ किलो, लोणी ५०० ग्रॅम,आयसिंग शुगर ५०० ग्रॅम, पाणी १८० मिलि, बेकिंग पावडर१० ग्रॅम
कृती :
परिपक्व हिरवी केळी निवडावीत. ही केळी गरम पाण्यात ७० ते ७५ अंश सेल्सिअस तापमानात ५ मिनिटे बुडवून ठेवावीत. त्यानंतर केळीचे बारीक तुकडे करावेत. सन ड्रॉइंग/क्रॉस फ्लो ड्रॉइंग/काउंटर फ्लो पद्धतीने ७ ते ८ तासांसाठी कोरडी करावीत. (इनलेट तापमान ७५ अंश सेल्सिअस, आउटलेट तापमान : ४५ अंश सेल्सिअस)
केळी कापातील ओलावा ८ टक्यांपर्यंत कमी होईपर्यंत एवढे कोरडे करा. त्यानंतर त्याची पावडर तयार करावी.
ही पावडर योग्य पद्धतीने पॅकिंग करावी.
कुकीज निर्मिती
प्लॅनेटरी मिक्सरमध्ये ५०० ग्रॅम वनस्पती तूप आणि ५०० ग्रॅम साखर ५ मिनिटे मिसळावी.त्यानंतर प्लॅनेटरी मिक्सरमध्ये १ किलो केळीचे पीठ आणि १० ग्रॅम बेकिंग पावडर चाळून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये १८० मिलि पाणी मिसळावे. हे मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत घट्ट करावे. तयार मिश्रण योग्य पद्धतीने सपाट पसरून कटर वापरून कुकीज तयार कराव्यात.
२० मिनिटांसाठी १६५ अंश सेल्सिअस तापमानाला बेकिंग ओव्हन मध्ये बेकिंग करावे.त्यानंतर तयार झालेल्या कुकीज थंड झाल्यानंतर पॅकिंग कराव्यात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.