Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Availability : सांगलीत ९ लाख टन चाऱ्याची उपलब्धता

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात उन्हाळी हंगामात ४ हजार ५१९ हेक्टरवर चारा पिकाची लागवड केली होती. तर शेतकऱ्यांनी कोरड्या चाऱ्याची तजबीज केली. त्यामुळे एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत पुरेल इतका ओला व सुका असा एकूण ९ लाख टन चारा उपलब्ध आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.

जिल्ह्यात गतवर्षी अपुरा पाऊस आणि पाण्याची टंचाई यामुळे खरीप हंगाम वाया गेला. तर रब्बी हंगामातील पिके हाताशी आली नाही. परिणामी चाराटंचाईचे सावट निर्माण झाले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने एप्रिल, मे मध्ये ७ हजार २७२ शेतकऱ्यांना ४१ हजार ८१६ किलो बियाणे वाटप केले. शेतकऱ्यांनी चारा पिकाची लागवड केली. तसेच भविष्यात चारा टंचाई भासू नये यासाठी आंतर जिल्हा आणि सीमावर्ती जिल्ह्यात चारा विक्री आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात चारा टंचाई निर्माण झाली नाही.

दरम्यान, उन्हाळ्यात ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू असल्याने शेतकऱ्यांचा चारा पिकाच्या लागवडीकडे कल वाढला. त्यामुळे उन्हाळी हंगामात ४ हजार ५१९ हेक्टरवर चारा पिकाची लागवड झाली होती. तसेच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील ज्वारी आणि मक्याचा वाळका चारा उपलब्ध केला.

त्यामुळे जिल्ह्यात यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतही चारा टंचाई निर्माण झाली नाही. जिल्ह्यात सध्या ओला चारा ६,१९,९२२ टन तर कोरडा चारा २,९४,६७० टन उपलब्ध आहे. सर्वाधिक चारा कवठेमहांकाळ तालुक्यात उपलब्ध आहे. तर जत तालुक्यात २१ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे.

तालुकानिहाय उपलब्ध चारा दृष्टीक्षेप

तालुका ओला चारा कोरडा चारा एकूण उपलब्ध चारा

आटपाडी ७४,९९९ ६,९५७ ८१,९५५

जत ५९,९६७ २३,१८४ ८३,१५१

तासगाव ३१,०३५ २०,६९० ५१,७२५

खानापूर ५३,४०१ १,८२२ ५५,२२३

कवठेमहांकाळ ७०,६०१ १,३४,५६८ २,०५,१६९

कडेगाव ३८,३७५ ५४३८ ४३,८१३

मिरज ५५,५६४ २४३३७ ७९,९०१

पलूस ६१,६०९ १५,४०९ ७७,०१८

शिराळा ३७,९४९ १६,७९२ ५४,७४०

वाळवा १,३६,४२२ ४५,४७४ १,८१,८९६

एकूण ६,१९,९२२ २,९४,६७० ९,१४,५९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

SCROLL FOR NEXT